A42

 नवरात्र आरती


आश्विनशुद्धपक्षीं अंबा बैसली सिंहासनी हो । प्रतिपदेपासून घटस्थापना ती करूनि हो । मूलमंत्रजप करूनी भोवतें रक्षक ठेऊनि हो । ब्रह्माविष्णुरुद्र आईचे पूजन करिती हो ।। १ ।।


उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो । उदोकारे गर्जती काय महिमा वर्ण तिचा हो ।। धृ ।।


द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनि हो । सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।। कस्तुरीमळवट भांगी शेंदुर भरूनी हो । उदोकारें गर्जती सकळ चामुंडा मिळुनि हो ।। उदो ।। २ ।।


तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो । मळकट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो ।। कंठीची पदके कांसे पीतांबर पिवळा हो । अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ।। उदो ।। ३ ।।


चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो । उपासकां पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणीं हो ।। पूर्ण कृपें पाहसी जगन्माते मनमोहिनी हो । भक्तांच्या माऊलि सुर ते येती लोटांगणी हो ।। उदो ।। ४।।


पंचमीचे दिवशर्शी व्रत तें उपांगललिता हो । अर्घ्यपाद्यपूजनें तुजला भवानी स्तविती हो ।। रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो । आनंदें प्रेम तें आलें सद्भावें क्रीडता हो ।। उदो ।। ५ ।।

A19

 अंबा आरती


सुखसदने शशिवदने अंबे मृगनयने । गजगमने सुरनमने कोल्हापुरमथने । सुरवर वर्षति सुमनें करुनियां नमनें । भयहरणे सुखकरणे सुंदरी शिवरमणे ।। १ ।।


जय देवी जय देवी वो जय अंबे । कोल्हापुराधिस्वामिणि तुज वो जगदंबे ।। धृ ।।


मृगमदमिश्रित केशर शोभत तें भाळीं । कुंचित केश विराजित मुगुटांतून भाळीं । रत्नजडित सुंदर अंगी कांचोळी । चिद्गगगनाचा गाभा अंबा वेल्हाळी ।। जय ।। २ ।।


कंठी विलसत सगुण मुक्ता सुविशेषे । पीतांबर सुंदर कसियेला कांसे । कटितटि कांची किंकिणि ध्वनि मंजुळ भासे । पदकमळ लावण्ये अंबा शोभतसे ।। जय ।। ३ ।।


झळझळझळझळ झळकति तानवडें कर्णी । तेजा लोपुनि गेले रविशशि निज करणीं । ब्रह्महरिहर सकळिक नेणति तव करणी । अद्भुत लीला लिहितां न पुरे ही धरणी ।। जय ।। ४ ।।


अष्टहि भूजा सुंदर शोभतसे । झगझगझगझगझगति लावण्यगाभा । म्हगम्हगम्हगम्हगम्हगीत समनांची शोभा ।। त्र्यंबक मधुकर होऊनि वर्णितसे अंबा ।। ५।।

A62

 आरती भुवनसुंदराची


आरती भुवनसुंदराची । इंदिरावरा मुकुंदाची ।। धृ ।।


पद्मसम पादयुग्मरंगा । ओंवाळणी होति भृंगा । नखमणि श्रवताहे गंगा। जे कां त्रिविधतापभंगा ।। फ़चालप्र वर्तुळ गुल्फ भ्राजमाने। किंकिणीक्वणितरु नाद घणघणितरु बांकिवर झुणितरु नेपुरें झनन मंजिरीची । झनन ध्वनी मंजिरीची ।।१।। आरती भुवन


पीतपट हाटकतप्तवर्णी। कांची नितंबसुस्थानीं । नाभिची अगाध हो करणी। विश्वजनकाची जे जननी ।। तचालप्र त्रिवलीललित उदरशोभा । कुंबुगळां माळ विलम्बितरु झळाळ कौस्तुभरु सरळ बाहु श्रिवत्स तरल मणि मरळ कंकणाची । प्रीति बहुरु जडित कंकणाची ।। २ ।। आरती भुवन


इंदुसम आस्य कुंदरदना । अधरारुणार्कबिंबवदना । पाहतां भ्रांति पडे मदना। सजलमेयब्धि दैत्यदमना ।। तचालप्र झळकत महरकुंडलाभा । कुटिल कुंतलींरु मयुरपत्रावली वेष्टिलीरु तिलक भालिंरु केशरी झळाळित कृष्णकस्तुरीची । अक्षता काळि कस्तुरीची ।। ३।। आरती भुवन


कल्पद्रुमातळीं मूर्ती । सौदामिनी कोटिदिप्ती । गोपीगोपवलयभंवती । त्रिविष्टप पुष्पवृष्टि करिती ।। फ़्रचालप्र मंजुळ मधुर मुरलिनदें । चकित गंधर्वरु चकित अप्सरारु सुरागिरिवरारु धरा कर्पूरारतीनें प्रेमयुक्त सची ।आरती ऑवळित साची ।। ४ ।। आरती भुवन


वृंदावनिंचे विहरणि । सखे गे कृष्णमायबहिणी । श्रमलों भवाभ्धिचे फिरणीं । आतां मज ठाव देई चरणीं ।। फ़चालप्र अहा हे पूर्ण पुण्यश्लोका । नमितों चरण शरणरु मी करुणा येऊ दे विशालपाणीरु कृष्ण नेणतें बाळ आपुलेंरु राखि लाज याची ।। ५।। आरती भुवन

A14

 श्री आत्मारामाची आरती


नानादेहीं देव एक विराजे । नाना नाटकलीला सुंदर रूप साजे । नाना तीर्थी क्षेत्रीं अभिनव गति माजे । अगाध महिमा पिंड ब्रह्मांडर्डी गाजे ।। १ ।।


जय देव जय देव जय आत्मारामा । निगमागम शोधिता न कळे गुणसीमा ।। धृ ।।


बहुरूपी बहुगुणी बहुतां काळाचा । हरिहर ब्रह्मादिक देव सकळाचा । युगानुयुगीं आत्माराम आमुचा । दास म्हणे महिमा न बोलवे वाचा ।। जय ।। २ ।।

A12

 श्री शंकर आरती ३


जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो । त्रिशूल पाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा हो ।। वृषभारुढ फणिभूषण दशभुज पंचानन शंकरा हो । विभूतिमाळाजटा सुंदर गजचर्मांबरधरा हो ।। धृ ।।


पडलें गोहत्येचें पातक गौतमऋषिच्या शिरी हो । त्याने तप मांडिले ध्याना आणुनि तुज अंतरी हो ।। प्रसन्न होऊनि त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो । औदुंबरमुळी प्रगटे पावन त्रैलोक्यातें करी हो ।। जय ।। १ ।।


धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्ण किती हो । आणिकही बहुतीतें गंगाद्वारादिक पर्वती हो ।। वंदन मार्जन करिती त्याचे महादोष नासती हो । तुझिया दर्शनमात्रे प्राणी मुक्तीतें पावती हो ।। जय ।। २ ।।


ब्रह्मगिरींची भावें ज्याला प्रदक्षिणा जरी घडे हो । तै ते काया कष्टें जंव जंव चरणी रुपती खडे हो ।। तंव तंव पुण्य विशेष किल्मिष अवघे त्याचें झडे हो । केवळ तो शिवरुपी काळ त्याच्या पाया पडे हो ।। जय ।। ३ ।।


लावुनिया निजभजनी सकळही पुरविसी मनकामना हो । संतति संपत्ति देसी अंती चुकविसी यमयातना हो ।। शिव शिव नाम जपता वाटे आनंद माझ्या मना हो । गोसावीनंदन विसरे संसारयातना हो ।। जय ।। ४ ।।

A11

 श्री शंकर आरती २


जय देव जय देव श्रीमंगेशा । पंचारति ओवाळू सदया सर्वेशा ।। धृ।।


सदया सगुणा शंभो अजिनांबरधारी । गौरीरमणा आद्या मदनांतकारी ।। त्रिपुरारी अधहारी शिवमस्तकधारी । विश्वंभर विरुदे हैं नम संकट धारी ।। जय ।। १ ।।


भयकृत भयनाशन ही नामें तुज देवा । विबुधादिक कमळासन वांछिती तव सेवा ।। तुझे गुण वर्णाया वाटतसे हेवा । अभिनव कृपाकटाक्षे मतिउत्सव द्यावा ।। जय ।। २ ।।


शिव शिव जपता शिव तू करिसी निजदासा । संकट वारी मम तूं करी शत्रुविनाशा ।। कुळवृद्धीते पाववी हीच असे आशा । अनंतसुत वांछितसे चरणांबुजलेशा ।। जय ।। ३ ।।

A8

श्री विठ्ठल आरती ३


ओवाळू ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा । राईरखुमाबाई सत्यभामेच्या वरा ।। धृ ।।


कनकाचे पर्येळी उजळोनी आरती । रत्नदीपशोभा कैशा प्रकाशल्या ज्योती ।। ओवाळू ।। १ ।।


मंडित चतुर्भुज कानीं शोभत कुंडले । श्रीमुखाची शोभा पाहतां तेज फांकले ।। ओवाळू ।। २ ।।


वैजयंती माळ गळा शोभे स्यमंत । शङ्गचक्रगदापद्म आयुधे शोभत ।। ओवाळू ।। ३ ।।


सांवळा सुंदर जैसा कर्दळीचा गाभा । चरणीईंचीं नूपुरें वांक्या गाजती नभा ।। ओवाळू ।। ४ ।।


ओवाळीता मन माझें ठाकलें ठायी । समाधिस्थसमान तुकया लागला पायी ।। ओवाळू ।।५।।

A25

 श्रीकृष्णाची आरती ३

अवतार गोकुळी हो । जन तारावयासी । लावण्यरुपडे हो । तेजः पुंजाळ राशी । उगवले कोटिबिंब । रवि लोपला शशी । उत्साह सुरवरां । महाथोर मानसी ।। १ ।।


जय देवा कृष्णनाथा । राईरखुमाई कांता । आरती ओवाळीन । तुम्हा देवकीसुता ।। धृ ।।


कौतुक पहावया । भाव ब्रह्मयाने केली । वत्सेंही चोरूनिया । सत्यलोकासी नेलीं । गोपाल गाईवत्सें । दोन्ही ठाई रक्षिली । सुखाचा प्रेमसिंधू । अनाथांची माऊली ।। २ ।।


चोरितां गोधनें हो। इन्द्र कोपला भारी । मेघ कडाडिला । शिला वर्षल्या धारी । रक्षिले गोकुळ हो । नखीं धरिला गिरी । निर्भय लोकपाळ । अवतरला हरी ।। ३ ।।


वसुदेव देवकीचे । बंद फोडिली शाळ । होऊनिया विश्वजनिता। तया पोटिंचा बाल । दैत्य हे त्रासियेले । समुळ कंसासी काळ । राज्य हें उग्रसेना । केला मथुरापाळ ।। ४ ।।


तारिले भक्तजन । दैत्य सर्व निर्दाळून । पांडवा साहाकारी । अडलिया निर्वाणी । गुण मी काय वर्ण । मति केवढी वानूं । विनवितो दास तुका । ठाव मागे चरणी ।। ५।।

A27

 श्री कृष्णाची आरती ५


ऐकोनी कृष्णकीर्ती मन तेथें वेधलें । सगुणरूप माये माझ्या जीवीं बैसलें । तें मज आवडतें अनुमान न बोले । पाहावया रूप याचें उतावीळ हो झालें ।। ۹۱۱


यालागीं आरती हो कृष्णा पाही हो सखी । आणिक नावडे हो दुजे तिहीं हो लोकीं ।। धृ।।


पाऊल कृष्णजीचें माझ्या जीवीं बैसलें । सनकादिक पाहा महा आसक्त झाले । मुक्त जो शुकमुनी तेणें मनीं धरिलें । तें मी केवीं सोडूं मज बहू रुचलें ।। २ ।।


निर्गुण गोष्टि माये मज नावडे साचें । सगुण बोल कांहीं केव्हां आठवी वाचें । पाया लागेन तूझ्या हेंचि आर्त मनींचें । तेणें घडेल दास्य रमावल्लभाचें ।। ३ ।।

A31

 श्री सद्गुरूंची आरती ३


धन्य धन्य हे प्रदक्षिणा सद्गुरुरायाची । झाली त्वरा सुरवरां विमान उतरायाची ।। धृ ।।


पदोपदीं अपार झाल्या पुण्याच्या राशी । सर्वही तीर्थे घडलीं आम्हा आदिकरुनि काशी ।। १ ।।


मृदंग टाळ घोळ भक्त भावार्थे गाती । नामसंकीर्तनें ब्रह्मानंदें नाचती ।। २ ।।


कोटि ब्रह्महत्या हरती करितां दंडवत । लोटांगण घालितां मोक्ष लोळे पायांत ।।३।।


गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा निगमांसी । अनुभव ते जाणती जे गुरुपर्दिचे रहिवासी ।। ४ ।।


प्रदक्षिणा करूनि देह भावें वाहिला । श्रीरंगात्मज विठ्ठल पुढें उभा राहिला ।। ५ ।।

A33

 श्रीरामचंद्रांची आरती २


त्रिभुवनमंडित माळ गळां । आरति ओवाळू पाहूं ब्रह्मपुतळा ।। १ ।। श्रीराम जयराम जयजय राम । आरति ओंवाळू पाहूं सुंदर मेघश्याम ।। धृ ।।


ठकाराचे ठाण वारीं धनुष्य बाण। मारुती सन्मुख उभा कर जोडून ।। २ ।।


भरतशत्रुघ्न दोघे चामर ढाळिती। स्वर्गाहून देव पुष्पवृष्टी करीती ।। ३ ।।


रत्नजडित हार वर्ण काय मुकुटी। आरती ओंवाळू चौदा भुवनांच्या कोटी ।। ४ ।।


विष्णुदास नामा म्हणे मागतो तूतें । आरती ओंवाळू पाहूं सीतापतीतें ।। ५ ।।

A47

 श्रीगीतेची आरती


जय देवी जय देवी जय भगवद्गीते । आरती ओवाळू तुज वेदमाते ।। धृ।।


सुखकरणी दुखहरणी जननी वेदांची । अगाध महिमा तुझा नेणे विरंची ।। ते तूं ब्रह्मी होतिस लीन ठायींची । अर्जुनाचें भावें प्रकट मुखींची ।। जय ।। १ ।।


सात शतें श्लोक व्यासोक्तीसार । अष्टादश अध्याय इतुका विस्तार ।। अर्ध पाद करितां उच्चार । स्मरणमात्रं त्यांच्या निरसे संसार ।। जय ।। २ ।।


काय तुझा पार नेणें मी दीन । अनन्यभावें तुजला आलों मी शरण ।। सनाथ करीं माये कृपा करून । बापरखुमादेवीवरदासमान ।। जय ।। ३ ।।

A21

 गंगामाईची आरती


माते दर्शनमात्रै प्राणी उद्धरिसी । हरिसी पातक अवघे जग पावन करिसी ।। दुष्कर्मी मी रचिल्या पापांच्या राशी । हर हर आतां स्मरतों मति होईल कैसी ।। १ ।।


जय देवी जय देवी जय गंगाबाई । पावन करि मज सत्वर विश्वाचे आई ।। धृ ।।


पडले प्रसंग तैशी कर्मे आचरलों । विषयांचे मोहानें त्यातचि रत झालों ।। त्याचे योगे दुष्कृत सिंधूत बुडालों । त्यांतुनि मजला तारिसि ह्या हेतूनें आलों ।। जय ।। २ ।।


निर्दय यमदुत नेती त्या समयीं राखीं । क्षाळीं यमधर्माच्या खात्यातील बाकी ।। मत्संगति जन अवघे तारियले त्वां की । उरलो पाहें एकचि मी पतितांपैकी ।। जय ।। ३ ।।


अघहरणे जय करुणे विनवितसे भावें । नोपेक्षी मज आतां त्वत्पात्रीं घ्यावें ।। केला पदर पुढे मी मज इतकें द्यावें । जीवे त्या विष्णूच्या परमात्मनि व्हावें ।। जय ।। ४ ।।

A48

 श्री सत्यनारायणाची आरती


जय जय दीनदयाळ सत्यनारायण देवा । पंचारति ओवाळू श्रीपति तुज भक्तिभावा ।। धृ।। विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण । परिमळद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून ।। घृतयुक्त शर्करामिश्रित गोधूमचूर्ण । प्रसाद भक्षण करितां प्रसन्न तूं नारायण ।। जय ।। १ ।। शतानंद विप्रें पूर्वी व्रत हैं आचरिलें । दरिद्र दवडुनि अंतीं त्यातें मोक्षपदा नेलें ।। त्यापासुनि हैं व्रत या कलियुगिं सकळां श्रुत झालें । भावार्थे पूजितां सर्वा इच्छित लाधलें ।। जय ।। २।। साधुवैश्यें संततिसाठीं तुजला प्रार्थियलें । इच्छित पुरतां मदांध होऊनि व्रत न आचरिलें ।। त्या पापानें संकटिं पडुनी दुःखहि भोगिलें । स्मृति होऊनि आचरितां व्रत त्या तुवांचि उद्धरिलें ।। जय ।। ३ ।। प्रसाद विसरुनि पतिभेटीला कलावती गेली । क्षोभ तुझा होतांचि तयाची नौका बुडाली ।। अंगध्वजरायाची यापरि दुःखस्थिति आली । मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णी परिसली ।। जय ।। ४ ।। पुनरपि पूजुनि प्रसाद ग्रहण करितां तत्क्षणीं । पतिची नौका तरली देखे कलावती नयनीं ।। अंगध्वजरायासी पुत्र भेटति येऊनि । ऐसा भक्तां संकटिं पावसि तूं चक्रपाणी ।। जय ।। ५।। अनन्यभावें पूजुनि हैं व्रत जे जन आचरति । इच्छित पुरविसी त्यांतें देउनि संतति संपत्ती ।। संहरती भवदुरितें सर्वहि बन्धनें तुटती । राजा रंका समान मानुनि पावसी श्रीपती ।। जय ।। ६ ।। ऐसा तव व्रतमहिमा अपार वर्णं मी कैसा । भक्तिपुरस्सर आचरती त्यां पावसि जगदीशा ।।

A34

 श्री रामचंद्रांची आरती ३


स्वस्वरूपोन्मुबुद्धि वैदेही नेली । देहात्मकाभिमानें दशग्रीवें हरिली । सद्विवेकमारूतिनें तच्छुद्धि आणिली । तव चरणांबुजि येऊनि वार्ता श्रुत कली ।। १ ।।


जय देव जय देव जय निजबोधा रामा । परमार्थे आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ।। धृ ।।


उत्कट साधुनि शिळा सेतु बान्धोनि । लिंगदेहलंकापुरी विद्धवंसोनी । कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी । देह अहंभाव रावण निवटोनि ।। जय ।। २ ।।


प्रथम सीताशोधी हनुमन्त गेला । लंकादहन करूनी सखया मारीला । वधिला जंबूमाळी भुवनी त्राहटीला । आनंदाची गुढी घेऊनिया आला ।। जय ।। ३ ।।


निजबळें निजशक्ती सोडविली सीता । म्हणुनी येणें झाले अयोध्ये रघुनाथा । आनंदे ओसंडे वैराग्य भरता । आरती घेऊनि आली कौसल्या माता ।। जय ।। ४ ।।


अनुहत वाजिंत्रध्वनि गर्जती अपार । अठरा पद्म वानर करिती भुभुःकार । अयोध्येसी आले दशरथ कुमार । नगरी होत आहे आनंद थोर ।। जय ।। ५ ।।

A35

 श्री रामचंद्रांची आरती ४


रत्नांची कुंडलें माला सुविराजे । झळझळ गंडस्थळ घननीळ तनू साजे । घंटा किंकिणि अंबर अभिनव गति साजे । अंदु वांकी तोडर नुपुर ब्रीद गाजे ।। १ ।।


जय देव जय देव जय रघुवर ईशा । आरती निर्जरवर ईशा जगदीशा ।। धृ ।।


राजिव लोचन मोचन सुरवर नरनारी । परातपर अभयंकर शंकर वरधारी । भूषणमंडित उभा त्रिदश कैवारी । दासा मंडण खंडण भवभय अपहारी ।। जय देव ।। २ ।।

A37

 श्रीरामदासांची आरती


आरती रामदासा । भक्त विरक्त ईशा ।। उगवला ज्ञानसूर्य । उजळोनी प्रकाशा ।। धृ ।। साक्षात् शंकराचा । अवतार मारुती ।। कलिमार्जी तेचि जाली । रामदासाची मूर्ती ।। १ ।। वीसही दशकांचा । दासबोध ग्रंथ केला ।। जडजीवां उद्धरीलें । नृप शिवासी तारिलें ।। २ ।। ब्रह्मचर्य व्रत ज्याचें । रामरूप सृष्टि पाहे । कल्याण तिहीं लोकीं । समर्थ सद्गुरुपाय ।। ३ ।।

A45

 दासबोधांची आरती


वेदांतसंमतीचा काव्यसिंधू भरला । श्रुतिशास्त्रग्रंथ साक्ष संगमू केला ।। महानुभव संतजनी अनुभव चाखियला । अज्ञान जड जीवां मार्ग सुगम केला ।। १।।


जय जयाजी दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा । आरती ओंवाळीन विमलज्ञान बाळबोधा ।। धृ ।।


नवविधा भक्तिपंथें रामरूपानुभवी । चातुर्यनिधि मोठा मायाचक्र उघवी ।। हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावीं । बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी ।। जय ।। २ ।।


वीसही दशकींचा अनुभव जो पाहे । नित्यनेमें विवरीतां स्वयें ब्रह्मची होये ।। अपार पुण्य गांठी तरी श्रवण लाही । कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयीं ।। जय ।। ३ ।।

A51

 श्री ज्ञानेश्वरांची आरती


आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधुसन्त मनू वेधला माझा ।। १।। आरती


लोपले ज्ञान जगीरु हित नेणती कोणीरु अवतार पांदुरंगरु नाम ठेवीले ज्ञनी ।। २ ।। आरती


कनकाचे ताट करीरु उभ्या गोपिका नारीरु नारद तुम्बरहूरु साम गायन करी ।। ३ ।। आरती


प्रकट गुह्य बोलेरु विश्व ब्रह्मची केलेरु रामा जनार्दनीरु पायी टकची ठेले ।। ४ ।। आरती

A54

 श्रीतुकारामांची आरती १


आरती तुकारामा । स्वामी सद्गुरुधामा ।। सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवी आम्हां ।। धृ।। राघवें सागरांत । पाषाण तारीले ।।


तैसे हे तुकोबाचे । अभंग उदकीं रक्षिले ।। १ ।। तुकितां तुलनेसी । ब्रह्म तुकासी आलें ।। म्हणुनी रामेश्वरें । चरणीं मस्तक ठेविलें ।। २ ।।

A58

 श्री मंगळागौरीची आरती


जय देवी मंगळागौरी। ओंवाळीन सोनियातार्टी ।। रत्नांचे दिवे । माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती ।। धृ।। मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया ।। तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया ।। ۹۱۱ पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या । सोळा तिकटीं सोळा दूर्वा ।। सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे ।। पारिजातकें मनोहरें । नंदेटें तगरें। पूजेला ग आणिली ।। २ ।। साळीचे तांदुळ मुगाची डाळ । आळणीं खिचडी रांधिती नारी ।। आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ।। ३ ।। डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती। कळावी कांकणें गौरीला शोभती ।। शोभली बाजुबंद । कार्नी कापांचे गवे। ल्यायिली अंबा शोभे ।। ४ ।। न्हाउनी माखुनी मौनी बैसली। पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली ।। स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ।। ५ ।। सोनिया ताटीं घातिल्या पंचारती। मध्यें उजळती कापुराच्या वाती ।। करा धूप दीप । आतां नैवेद्य षड्रस पक्वानें। तीं भरा बोनें ।। ६ ।। लवलाहें तिधें काशीसी निघाली। माउली मंगळागौर भिजवू विसरली ।। मागुती परतुनीयां आली । अंबा स्वयंभू देखिली ।। देउळ सोनियाचे । खांब हिरेयांचे कळस वरती मोतियांचा ।। ७ ।।

A59

 वटसावित्रीची आरती


अश्वपती पुसता झाला । नारद सांगताती तयाला ।। अल्पायुषी सत्यवंत । सावित्रीनें का प्रणीला ।। आणखी वर वरी बाळे। मनीं निश्चय जो केला ।। आरती वडराजा ।।१।। दयावंत यमदूजा । सत्यवंत ही सावित्री ।। भावे करीन मी पूजा । आरती वडराजा ।। धृ।। ज्येष्ठामास त्रयोदशी । करिती पूजन वडार्शी ।। त्रिरात्र व्रत करूनीया । जिंकी तूं सत्यवंताशी । आरती वडराजा ।। २।। स्वर्गावरी जाऊनियां। अग्निखांब कचळीला ।। धर्मराजा उचकला। हत्या घालील जीवाला । येई ग पतिव्रते ।। पती नेई गे आपुला ।। आरती वडराजा ।। ३।। जाऊनियां यमापार्शी । मागतसे आपुला पती ।। चारी वर देऊनियां। दयावंता द्यावा पती ।। आरती वडराजा ।।४।। पतिव्रते तुझी कीर्ति । ऐकुनी ज्या नारी ।। तुझें व्रतें आचरती । तुझी भुवनें पावती ।। आरती वडराजा ।। ५।। पतिव्रते तुझी स्तुती । त्रिभुवनी ज्या करिती ।। स्वर्गी पुष्पवृष्टी । करुनियां आणिलासी आपुला पती । अभय देऊनियां । पतिव्रते तारी त्यासी ।। ६ ।।

A60

 तुळशीची आरती


जय देवी जय देवी जय तुळसी । निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळिसी ।। धृ।। ब्रह्मा केवळ मुळीं मध्यें तो शौरी । अग्रर्गी शंकर तीर्थे शाखा परिवारों ।। सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।


मराठी आरती संग्रह


दर्शनमात्रै पापें हरती निर्धारीं ।। १ ।। शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी । मंजिरीची बहु आवड कमळारमणासी ।। तव दलविरहित विष्णू राहे उपवासी ।


विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासीं ।। २ ।। अच्युत माधव केशव पीतांबरधारी । तुझिया पूजनकाळीं जो हें उच्चारी ।। त्यासी देसी संतति संपति सुखकारी । गोसावीसुत विनवी मजला तूं तारी ।। ३ ।।


A52

 


श्रीनामदेवांची आरती


जन्मतां पांडुरंगे जिव्हेवरी लिहिलें । अभंग शतकोटी प्रमाण कवित्व रचिले ।। १ ।।


जय जयाजी भक्तराया जिवलग नामया । आरती ओंवाळीतां चित्त पालटे काया ।। धृ ।।


घ्यावया भक्तिसुख पांडुरंगे अवतार । धरूनियां तीर्थमेषं केला जगाचा उद्धार ।। जय ।। २ ।।


प्रत्यक्ष प्रचितीं हे वाळवंट परिस केली । हारपली विषमता द्वैतबुद्धि निरसली ।। जय ।। ३ ।।


समाधि महाद्वारी श्रीविठ्ठलचरणीं । आरती ओंवाळीतों परिसा कर जोडुनी ।। जय ।। ४ ।।

A40

 श्री एकनाथांची आरती


आरती एकनाथा । महाराजा समर्था ।। त्रिभुवनीं तूंचि थोर । जगद्गुरु जगन्नाथा ।। धृ।। एकनाथ नाम सार । वेदशास्त्रांचें गूज ।। संसारदुःख नास । महामंत्राचें बीज ।। १ ।। एकनाथ नाम घेतां । सुख वाटलें चित्ता ।। अनंत गोपाळदासा । धणी न पुरे गातां ।। २।।

A57

 श्रीशनिदेवाची आरती


जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरीं ठेवा ।। आरती ओवाळितों । मनोभावें करूनी सेवा ।। धृ।। सूर्यसूता शनिमूर्ती । तुझी अगाध कीर्ती ।। एक मुखें काय वर्णं। शेषा न चले स्फूर्ती ।। १ ।। नवग्रहामाजीं श्रेष्ठ । पराक्रम थोर तुझा ।। ज्यावरी कृपा करिसी । होय रंकाचा राजा ।। २।। विक्रमासारिखा हो । शककर्ता पुण्यराशी ।। गर्व धरितां शिक्षा केली। बहु छळियलें त्यासी ।। ३ ।। शंकराच्या वरदानें। गर्व रावणें केला ।। साडेसाती येतां त्यासी । समूळ नाशासी नेला ।। ४।। प्रत्यक्ष गुरुनाथा । चमत्कार दावियेला ।। नेऊनी शूलापाशी । पुन्हा सन्मान केला ।। ५।। ऐसे गुण किती गाऊं । धणी न पुरे गातां ।। कृपा करी दीनावरी । महाराजा समर्था ।। ६ ।। दोन्ही कर जोडूनियां । रखमां लीन सदा पायीं ।। प्रसाद हाचि मागे । उदयकाळ सौख्य दावीं ।। ७ ।।

A63

 कांकड आरती १


उठा उठा हो साधक । साधा आपुलालें हित ।। गेला गेला हा नरदेह। मग कैंचा भगवंत ।। १ ।। उठा उठा हो वेगेंसीं । चला जाऊं राऊळासी ।। हरतिल पातकांच्या राशी। कांकड आरती पाहोनी ।। धृ।। उठोनियां हो पाहाटें। पाहा विठ्ठल उभा विटे ।। चरण तयाचे गोमटे । अमृतदृष्टीं अवलोका ।। २ ।। जागें करा रुक्मिणीवरा । देव आहे निजसुरा ।। वेगें निंबलोण करा । दृष्ट होईल तयासी ।। ३ ।। पुढें वाजंत्री । ढोल दमामे गर्जती ।। होत कांकड आरती। माझ्या पंढरीरायाची ।। ४ ।। सिंहनाद शंख भेरी। गजर होतो महाद्वारीं ।। केशवराज विटेवरी। नामा चरण वंदितो ।। ५।।

A65

 कांकड आरती ३


काकड आरती परमात्मया श्रीरघुपती । जीवशिव ओवाळीन निजीं निजात्मज्योती ।। धृ ।।


त्रिगुण काकडा द्वैतघृतं तिंबिला । उजळीतों आत्मज्योती तेणें प्रकाशला ।। काकड ।। १ ।।


काजळी तामस अवघे तेज डळमळ । अवनी आवर अवघा निग निज निश्चळ ।। काकड ।। २ ।।


उदय ना अस्त जेथें बोध प्रातः काळीं । रामी रामदास सहजीं सहज ओंवाळी ।। काकड ।। ३ ।।

A75

 पंचायतन आरती


अघसंकटभयनाशन सुखदा विग्धेशा । आद्या सुरवरवंद्या नरवारण वेशा ।। पाशांकुशधर सुंदर पुरवीसी आशा । निजवर देऊनि हरिसी भ्रांतीच्या पाशा ।। |۱۹۱۱


जय देव जय देव जय सुखकर मूर्ती । गणपति हरी शिवभास्कर अंबा सुखमूर्ती ।। धृ ।।


पयसागरजाकांता धरणीधरशयना । करुणालय वारिसि भववारिजदलनयना ।। गरुडध्वज भजन प्रिय पीतप्रभवसना । अनुदिनिं तव कीर्तनरस चाखो हे रसना ।। जय ।। २ ।।


नंदीवहना गहना पार्वतिच्या रमणा । मन्मथदहना शंभो वातातमजनयना ।। सर्वोपाय विवर्जित तापत्रयशमना । कैलासाचलवासा करिसी सुरनमना ।। जय ।। ३ ।।


पद्मबोधकरणा नेत्रभ्रमहरणा । गोधन बंधनहरता द्योतक आचरणा ।। किरण स्पर्शे वारिसि या तम आवरणा । शरणागत भयनाशन सुखवर्धनकरणा ।। जय ।। ४ ।।


त्रिभुवनउत्पति पालन करिसीइ तूं माया । नाहीं तुझिया रूपा दुसरी उपमा या ।। तुझा गुणगणमहिमा न कळे निगमा या । करुणा करिसी अंबे मनविश्रामा ।। जय ।। ५ ।।

A66

 धूपारती


जय देव जय देव पंढरीराया । धूप अर्पीतसें मी भावें तव पायां ।। धृ।। सोज्ज्वळ अग्निरूप निजतेजोराशी । अहंभाव धूप कृपें जाळीसी ।। त्याचा आनंद माझे मानसीं । तव दर्शनमोदें सुख हैं सर्वांसी ।। १ ।। पूर्णानंद देवा तूं सच्चिदानंदा । परमात्मा तूं अससी आनंदकंदा ।। पूर्ण करीं तूंची भक्तांच्या छंदा । अंगीकारुन धूप दे ब्रह्मानंदा ।। २ ।।


A69

नीरांजन आरती


पंचप्राणांचें नीरांजन करुनी । पंचतत्त्वें वाती परिपूर्ण भरुनी ।। मोहममतेनें समूळ भिजवोनी । अपरोक्ष प्रकाश दीप पाजळोनी ।। १ ।।


मराठी आरती संग्रह


जय देव जय देव जय नीरांजना । नीरांजन ओवाळू तुझिया समचरणा ।। धृ।। ज्वाला ना काजळी दिवस न राती । सदोदित प्रकाश भक्तीनें प्राप्ती ।। पूर्णानंदें धालों बोलों मी किती । उजळों हे शिवराम भावें ओंवाळीती ।। २ ।। ।। धृ।।

A73

 गणपति श्लोक


ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे । कविं कविनां उपमश्रवस्तमम् । ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः । शृण्वन् ऊतिभिः सीदसादनम् ।।


मंत्र पुष्पांजली


ॐ यज्ञेन यज्ञ‌मयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । ते ह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः संति देवाः ।। ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे । स मे कामान् काम कामाय मह्यं । कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय । महाराजाय नमः । ॐ स्वस्ति । साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुष आं तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकेराळिति । तदप्येषः श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे । आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ।।


एकदंतायविद्महे वक्रतुण्डाय धीमहि । तन्नोदंती प्रचोदयात् ।


।। मंत्रपुष्पांजली समर्पयामि।।


।। गणपतिबाप्पा मोरया ।।

A2

 गणपति श्लोक


ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे । कविं कविनां उपमश्रवस्तमम् । ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः । शृण्वन् ऊतिभिः सीदसादनम् ।।


मंत्र पुष्पांजली


ॐ यज्ञेन यज्ञ‌मयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । ते ह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः संति देवाः ।। ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे । स मे कामान् काम कामाय मह्यं । कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय । महाराजाय नमः । ॐ स्वस्ति । साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुष आं तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकेराळिति । तदप्येषः श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे । आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ।।


एकदंतायविद्महे वक्रतुण्डाय धीमहि । तन्नोदंती प्रचोदयात् ।


।। मंत्रपुष्पांजली समर्पयामि।।


।। गणपतिबाप्पा मोरया ।।


A1

 श्री गणेश आरती १


सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।

 नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।

 सर्वांगी सुंदर उटी शेंदूराची । 

कंठी झळके माळ मुक्ताफळाची ।।


जय देव जय देव जय मंगल मूर्ती । 

दर्शनमात्रे मन कामनापुर्ती ।। जय देव


रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।

 चंदनाची ऊटी कुंकुम केशरा ।

 हीरे जडित मुकुट शोभतो बरा ।

 रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ।। जय देव


लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।

 सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना ।

 दास रामाचा वाट पाहे सदना ।

 संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।। जय देव

Bottom Add