शुभ वेळी शुभ दिनी आली आमची वरात,
___रावांचे नाव घेते टाकून पहिले पाऊल घरात.
नाचत नाचत वाजत-गाजत आली आमची वरात,
___रावांचे नाव घेते ___च्या दारात.
जमले आहेत सगळे ___च्या दारात,
___रावांचे नाव घेते येऊ द्या ना घरात.
माझ्या___चा चेहरा आहे खूपच हसरा,
टेन्शन प्रॉब्लेम्स सगळे क्षणामध्ये विसरा.
खेळत होतो PUBG आला ब्लू झोन,
___चं नाव घेतो शोधून सेफ झोन.
पाण्यात घागर बुडताना आवाज येतो बुडबुड,
___आणि माझ्या Life मध्ये नको कुणाची लुडबुड.
बटाट्याच्या भाजीत घातला एकदम Tasty मसाला,
___च नाव माहितेय तरी मला विचारता कशाला?
तिची नि माझी केमिस्ट्री आहे एकदम वंडरफूल,
___माझी आहे खरंच कित्ती ब्युटीफुल.
रोज___म्हणून सारखी नावाने हाक मारतेस,
मग उखाणा घेताना___,
कशाला गं खोटे खोटे लाजतेस?
उखाणा घेते मी खूपच Easy,
___राव असतात नेहमी,
कामामध्ये Busy.
ढीगभर चपात्या किती पटापट लाटतेस,
___तू मला सुपरवूमन वाटतेस.
माझ्या Life मध्ये___भेटली Luckily,
कोणी काही बोलले तर करते माझी वकिली.
कॅन्टीन हॉटेलला ठोकला मी राम राम,
___च्या हातचं जेवण आवडते मला जाम.
पाहताच___ला जीव झाला येडापीसा,
तिच्या शॉपिंगच्या वेडापायी रिकामा होतो माझा खिसा.
लग्नासाठी Propose करायचं मी केलं Daring,
आता माझ्या जीवनाचं___च्याच हातात Steering.
शॉपिंगला जायला तयार होते मी झट्कन,
___चे नाव घेते तुमच्यासाठी पटकन.
रस्ता अडवायला जमल्या सगळ्या बहिणी,
___ला येऊ द्या घरात आवडली ना तुमची वहिनी?
त्यांचा नि माझा संसार होईल सुकर,
जेव्हा मी चिरेन भाजी आणि हे लावतील कुकर.
सुखी ठेवोत सर्वाना ब्रम्हा विष्णू आणि महेश,
___रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश.
लग्न झाले आता आमची बहरू दे संसारवेल,
___रावांचे नाव घेते वाजवून ___च्या घराची बेल.
हिरव्या हिरव्या जंगलात झाडी घनदाट,
___रावांचे नाव घेते सोडा माझी वाट.
___ची लेक झाली ___ची सून,
___च नाव घेते गृहप्रवेश करून.
सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी,
___रावांचे नाव घेते साथ जन्मासाठी.
इंद्रधनुष्यामध्ये रंग आहेत सात,
___रावांच नाव घेऊन पाऊल टाकते आत.
सर्वांपुढे नमस्कारासाठी जोडते दोन्ही हात,
___रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.
प्रेमळ लोकांना आवडते लव्ह शायरी,
___रावांसोबत ओलांडते मी घराची पायरी.
नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी वाकले,
___रावांसोबत मी सासरी पाऊल टाकले.
जमले आहेत सगळे___यांच्या दारात,
___रावांचे नाव घेते येऊ द्या ना घरात.
नागपूरची संत्री रसरशीत आणि गोड,
___च नाव घेतो आता तरी वाट सोड.
Facebook वर ओळख झाली आणि WhatsApp वर प्रेम जुळले,
___आहे कित्ती बिनकामी हे लग्नानंतर कळले.
सकाळी पिझ्झा दुपारी बर्गर,
___आहे माझ्या Life चा Server.
दिसते इतकी गोड की नजर तिच्याकडेच वळते,
___च्या एका स्माईल ने दिवसभराचे टेन्शन पळते.
यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो मुरली,
___आल्यापासून सॅलरी कधी नाही पुरली.
लग्न झालं की नाव घेणं हा जणू कायदा,
तुमची होते करमणूक पण आमचा काय फायदा?