कांकड आरती ३
काकड आरती परमात्मया श्रीरघुपती । जीवशिव ओवाळीन निजीं निजात्मज्योती ।। धृ ।।
त्रिगुण काकडा द्वैतघृतं तिंबिला । उजळीतों आत्मज्योती तेणें प्रकाशला ।। काकड ।। १ ।।
काजळी तामस अवघे तेज डळमळ । अवनी आवर अवघा निग निज निश्चळ ।। काकड ।। २ ।।
उदय ना अस्त जेथें बोध प्रातः काळीं । रामी रामदास सहजीं सहज ओंवाळी ।। काकड ।। ३ ।।