श्री सत्यनारायणाची आरती
जय जय दीनदयाळ सत्यनारायण देवा । पंचारति ओवाळू श्रीपति तुज भक्तिभावा ।। धृ।। विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण । परिमळद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून ।। घृतयुक्त शर्करामिश्रित गोधूमचूर्ण । प्रसाद भक्षण करितां प्रसन्न तूं नारायण ।। जय ।। १ ।। शतानंद विप्रें पूर्वी व्रत हैं आचरिलें । दरिद्र दवडुनि अंतीं त्यातें मोक्षपदा नेलें ।। त्यापासुनि हैं व्रत या कलियुगिं सकळां श्रुत झालें । भावार्थे पूजितां सर्वा इच्छित लाधलें ।। जय ।। २।। साधुवैश्यें संततिसाठीं तुजला प्रार्थियलें । इच्छित पुरतां मदांध होऊनि व्रत न आचरिलें ।। त्या पापानें संकटिं पडुनी दुःखहि भोगिलें । स्मृति होऊनि आचरितां व्रत त्या तुवांचि उद्धरिलें ।। जय ।। ३ ।। प्रसाद विसरुनि पतिभेटीला कलावती गेली । क्षोभ तुझा होतांचि तयाची नौका बुडाली ।। अंगध्वजरायाची यापरि दुःखस्थिति आली । मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णी परिसली ।। जय ।। ४ ।। पुनरपि पूजुनि प्रसाद ग्रहण करितां तत्क्षणीं । पतिची नौका तरली देखे कलावती नयनीं ।। अंगध्वजरायासी पुत्र भेटति येऊनि । ऐसा भक्तां संकटिं पावसि तूं चक्रपाणी ।। जय ।। ५।। अनन्यभावें पूजुनि हैं व्रत जे जन आचरति । इच्छित पुरविसी त्यांतें देउनि संतति संपत्ती ।। संहरती भवदुरितें सर्वहि बन्धनें तुटती । राजा रंका समान मानुनि पावसी श्रीपती ।। जय ।। ६ ।। ऐसा तव व्रतमहिमा अपार वर्णं मी कैसा । भक्तिपुरस्सर आचरती त्यां पावसि जगदीशा ।।