नवरात्र आरती
आश्विनशुद्धपक्षीं अंबा बैसली सिंहासनी हो । प्रतिपदेपासून घटस्थापना ती करूनि हो । मूलमंत्रजप करूनी भोवतें रक्षक ठेऊनि हो । ब्रह्माविष्णुरुद्र आईचे पूजन करिती हो ।। १ ।।
उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो । उदोकारे गर्जती काय महिमा वर्ण तिचा हो ।। धृ ।।
द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनि हो । सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो ।। कस्तुरीमळवट भांगी शेंदुर भरूनी हो । उदोकारें गर्जती सकळ चामुंडा मिळुनि हो ।। उदो ।। २ ।।
तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो । मळकट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो ।। कंठीची पदके कांसे पीतांबर पिवळा हो । अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो ।। उदो ।। ३ ।।
चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो । उपासकां पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणीं हो ।। पूर्ण कृपें पाहसी जगन्माते मनमोहिनी हो । भक्तांच्या माऊलि सुर ते येती लोटांगणी हो ।। उदो ।। ४।।
पंचमीचे दिवशर्शी व्रत तें उपांगललिता हो । अर्घ्यपाद्यपूजनें तुजला भवानी स्तविती हो ।। रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो । आनंदें प्रेम तें आलें सद्भावें क्रीडता हो ।। उदो ।। ५ ।।