श्रीरामचंद्रांची आरती २
त्रिभुवनमंडित माळ गळां । आरति ओवाळू पाहूं ब्रह्मपुतळा ।। १ ।। श्रीराम जयराम जयजय राम । आरति ओंवाळू पाहूं सुंदर मेघश्याम ।। धृ ।।
ठकाराचे ठाण वारीं धनुष्य बाण। मारुती सन्मुख उभा कर जोडून ।। २ ।।
भरतशत्रुघ्न दोघे चामर ढाळिती। स्वर्गाहून देव पुष्पवृष्टी करीती ।। ३ ।।
रत्नजडित हार वर्ण काय मुकुटी। आरती ओंवाळू चौदा भुवनांच्या कोटी ।। ४ ।।
विष्णुदास नामा म्हणे मागतो तूतें । आरती ओंवाळू पाहूं सीतापतीतें ।। ५ ।।