श्री सद्गुरूंची आरती ३
धन्य धन्य हे प्रदक्षिणा सद्गुरुरायाची । झाली त्वरा सुरवरां विमान उतरायाची ।। धृ ।।
पदोपदीं अपार झाल्या पुण्याच्या राशी । सर्वही तीर्थे घडलीं आम्हा आदिकरुनि काशी ।। १ ।।
मृदंग टाळ घोळ भक्त भावार्थे गाती । नामसंकीर्तनें ब्रह्मानंदें नाचती ।। २ ।।
कोटि ब्रह्महत्या हरती करितां दंडवत । लोटांगण घालितां मोक्ष लोळे पायांत ।।३।।
गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा निगमांसी । अनुभव ते जाणती जे गुरुपर्दिचे रहिवासी ।। ४ ।।
प्रदक्षिणा करूनि देह भावें वाहिला । श्रीरंगात्मज विठ्ठल पुढें उभा राहिला ।। ५ ।।