A14

 श्री आत्मारामाची आरती


नानादेहीं देव एक विराजे । नाना नाटकलीला सुंदर रूप साजे । नाना तीर्थी क्षेत्रीं अभिनव गति माजे । अगाध महिमा पिंड ब्रह्मांडर्डी गाजे ।। १ ।।


जय देव जय देव जय आत्मारामा । निगमागम शोधिता न कळे गुणसीमा ।। धृ ।।


बहुरूपी बहुगुणी बहुतां काळाचा । हरिहर ब्रह्मादिक देव सकळाचा । युगानुयुगीं आत्माराम आमुचा । दास म्हणे महिमा न बोलवे वाचा ।। जय ।। २ ।।

Bottom Add