कोल्हापूरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो …… ला जलेबी चा घास.
भाजीत भाजी मेथीची, ……माझ्या प्रितीची.
संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका, …चे नाव घेतो सर्व जण ऐका.
पुरणपोळीत तुप असावे साजुक, ……. आहेत आमच्या फार नाजुक.
पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, … च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार,
लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, …ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
नाशिकची द्राक्षे नागपुरची संत्री, … आज पासुन माझी गृहमंत्री.
सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, ………… चे नाव घेतो……..च्या घरात.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.
सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, …………..मला मिळाली आहे अनुरूप.
मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा, …चे नाव घेतो निट लक्ष ठेवा.
गाडीत गाडी डेक्कन क्वीन, ……. आहे माझी ब्युटी क्वीन.
एक होती चिऊ आणि एक होता काऊ,___च नाव घेतो डोकं नका खाऊ.
ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल,___च नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,___च नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
प्रेमाच्या चौकात किती पण फिरा,शोधून नाही सापडणार ___सारखा हिरा.
हिरव्यागार मैदानात खेळत होतो क्रिकेट,___ला पाहून पडली माझी विकेट.
सोन्याच्या कपावर चांदीची बशी,___समोर फिक्या पडतील रंभा आणि उर्वशी.
फुलांच्या तोरणात आंब्याचे पान,___च्या रूपाने झालो मी बेभान.
आंब्याला आहे फळांच्या राजाचा मान,___चे नाव घेतो ऐका देऊन कान.
चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ,___चं नाव घेतो पुढचं नाही पाठ.
कावळा करतो काव काव चिमणी करते चिव चिव,___चे नाव घेतो बंद करा टिव टिव.
डाळीत डाळ तुरीची डाळ,___च्या मांडीवर खेळवीन एक वर्षात बाळ.
उंदीर राहतो ती जागा असते बीळ,घायाळ करतो ___च्या गालावरचा तीळ.