56) Funny Anniversary Wishes In Marathi | लग्नवाढदिवसासाठी मजेशीर शुभेच्छा

मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारताना अनेकदा तुम्ही अनेकदा लग्नविषयावरील अनेक विनोद ऐकले असतीलच ना. तशाच या काही लग्नवाढदिवसाच्या मजेशीर शुभेच्छा. बुरा ना मानो बस एन्जॉय करो.


  1. बायको – आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आज मी चिकन बनवते,
    नवरा – चालेल. पण आपल्या चुकीची शिक्षा चिकनला का देत्येस?
  2. ईश्वराचे आभार माझ्या गोडव्याने, तुम्हाला मधुमेह झाला नाही,
    आपल्या नात्यातील गोडवा असाच वाढत राहो,
    लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  3. मी इतकी आनंदी आहे की,
    जन्मभर सतवण्यासाठी मला हक्काचा साथीदार मिळाला
    हॅप्पी अॅनिव्हर्सरी
  4. लग्न म्हणजे एखाद्या युध्दभूमीसारखे असते
    जिथे तुम्हाला युध्दासाठी सतत तयार राहावे लागते
    लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  5. तुमच्या दोघांची जोडीही देवाची देणगी आहे
    ती प्रेमाने आणि समर्पणाने तुम्ही जपली आहे
    कधी ना कमी होवो तुमच्यातील प्रेमाचा हा बहर,
    लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला पाठवत आहे ट्रकभर.
  6. लग्नाचे दोन महत्वाचे नियम – बायको नेहमी बरोबरच असते
    जेव्हा तुम्हाला वाटेल की ती चुकीची आहे
    तेव्हा स्वःताला मारा आणि पुन्हा पहिला नियम वाचा.
  7. तुझ्या ब्रम्हचर्याला या दिवशीच लागला होता फुलस्टॉप
    लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला मित्रा माझ्या खूप खास.
  8. तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी हीच आहे इच्छा,
    पेट्रोलच्या वाढत्या दराप्रमाणे तुमच्या प्रेमाचा आलेखही उंचावत राहो मित्रा.
  9. लग्नाच्या प्रेमाची गाडी चालते चार पायांवर,
    दुचाकीची चारचाकी होणाच्या
    या दिवसाच्या तुला खूप शुभेच्छा माझ्या मित्रा.
  10. मैत्रिणी तुझ्या नवऱ्याची मीच आहे साली खास,
    लग्नाच्या वाढदिवसाच्या तुला आणि जीजूंना शुभेच्छा एकदम खासमखास.
  11. सप्तपदी चालताना दिलीस मला साथ तशीच साथ
    आता महागाईच्या काळातही देशील ना राणी
    कारण मी तुझा राजा आणि तूच माझी राणी.

55) Marriage Anniversary Shayari In Marathi | लग्नवाढदिवसासाठी शायरी

लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा शायरीतून देण्याची एक वेगळीच मजा आहे. म्हणून तुमच्यासाठी खास लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा शायरीच्या रूपात.

  1. देवाने वेळ काढून जेव्हा एक क्षण आला असेल
    तेव्हा तुम्हाला त्याने प्रेमाने बनवलं असेल
    न जाणो कोणती प्रार्थना पूर्ण झाली असेल
    जेव्हा त्याने आपल्याला एकत्र आणलं असेल
    हॅपी एनिव्हर्सरी माय स्वीट हार्ट
  2. देवाकडे आनंद मागते आहे
    प्रार्थनांमध्ये तुझं हास्य मागते आहे
    असं तर कोणतंही गिफ्ट महागडं वाटत नाही
    फक्त तुझ्याकडे आयुष्यभर प्रेम मागते आहे
    लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
  3. आपल्या दोघांची जोडी देवाची कृपा आहे
    जिला आपण प्रेम आणि त्यागाने जपलं आहे
    कधी कमी न होवो हा प्रेमाचा ज्वर
    नेहमी कायम राहो हा प्रेमाचा बहर
    लग्नवाढदिवसाचे अभिनंदन
  4. चंद्र ताऱ्यांनी चमकत राहावं जीवन
    आनंदानी भरून जावो आपलं जीवन
    लग्नवाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा पार्टनर
  5. तुमची जोडी सलामत राहो
    आयुष्यात प्रेम वाढतच राहो
    प्रत्येक दिवस साजरा होवो सणासारखा
    तुमच्या लग्नवाढदिवसाला हीच आहे इच्छा
  6. कधी प्रेम कधी दुःख
    जीवनाचा हाच आहे नेम
    एकमेकांच्या प्रेमात राहा
    कारण आयुष्याचा नाही नेम
    आनंद, यश आणि खूप सुख मिळो
    प्रत्येक क्षण असाच खास होवो
    हॅपी अॅनिव्हर्सरी माझी आवडती जोडी
  7. उगवणारा सूर्य देवो तुम्हाला आशिर्वाद
    उमलणारं फुल देवो तुम्हाला सुगंध
    आम्ही तर काही देण्याच्या लायक नाही
    देव अनेक सुखं तुम्हाला देवो
    लग्नवाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा
  8. आयुष्याची बाग हिरवी राहो
    आयुष्यात प्रेमाची भरती येवो
    अशी जोडी राहो कायम आपली
    10 काय 100 वर्ष पूर्ण होवो
    लग्नवाढदिवस अभिनंदन सख्या
  9. आयुष्यात एकच इच्छा आहे
    सोबत तुझी असावी हीच ती आहे
    आयुष्य न संपो कधी आणि लग्नाचा वाढदिवस येवो दरवर्षी
  10. देवो करो आणि दरवर्षी येवो हा दिवस
    आपलं नातं नव्याने पुन्हा बहरवणारा हा दिवस
    असाच सुंगधित होवो वर्षातला प्रत्येक दिवस
    लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

54) Anniversary Wishes For Brother In Marathi | लग्नवाढदिवस शुभेच्छा भावासाठी

भावाचं स्थान आपल्या मनात कायम महत्त्वाचं असतं. लाडक्या भावाच्या लग्नासाठी नवरदेवाचे उखाणे शोधण्यापासून आपण तयारी केलेली असते. मग लाडक्या भावाच्या आणि वहिनीच्या लग्न वाढदिवसाला शुभेच्छा तर द्यायला हव्यात. खास लग्न वाढदिवस शुभेच्छा भावासाठी आणि वहिनीसाठी.

  1. तुमची जोडी कधी नये तुटू
    देव करो तुम्ही एकमेंकावर नका रूसू
    असेच एकत्र राहा आणि आयुष्याचा आनंद घ्या
    लग्न वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा दादा वहिनी
  2. फुलांसारखे सुंदर दिसता प्रेमाच्या बागेत
    दोघं छान दिसता एकमेकांच्या कवेत
    लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा आणि वहिनी
  3. तुम्ही एकमेकांच्या आयुष्याला सुंदर केलंत
    लग्नवाढदिवस धुमधडाक्यात करा
    कारण नात्याचं रूपांतर तुम्ही प्रेमात केलंत
    हॅपी अॅनिव्हर्सरी दादा वहिनी
  4. जीवनाच्या प्रत्येक क्षणात एकमेकांना आनंद द्या
    जिथे दुःख जाणवणार नाही असा सहवास द्या
    लग्नदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा वहिनी
  5. तुम्हाला लाख लाख शुभेच्छा
    आजच झाला होता हा सोहळा
    लगीनघाई करून दादाने आणलं
    वहिनीला घरी आणि उडाली आनंदाची कारंजी
    लग्न वाढदिवस खूप खूप शुभेच्छा दादा वहिनी
  6. जीवनाच्या प्रत्येक वळणावर असेच सोबत राहा
    एकमेंकाना आनंद द्या आणि सुखी राहा
    लग्नवाढदिवसाचा सोहळा होवो वारंवार
    हॅपी अॅनिव्हर्सरी दादा वहिनी
  7. लग्नवाढदिवसाबद्दल तुम्हाला शुभेच्छा
    कारण तुमच्यासारखे लोकं असतात कमी
    जे असतात सदैव सुखी Happy Anniversary
  8. देवाने जोडी बनवली आहे ही खास
    असं वाढत राहून प्रेमाचं हे झाड
    माझ्याकडून तुम्हा दोघांना
    लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
  9. दिवा आणि वातीसारखं तुमचं नातं
    नातं हे असंच वृद्धींगत होत रहावं
    माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे
    लग्नवाढदिवसाबद्दल अभिनंदन दादा वहिनी
  10. आला तो सुदिन पुनः एकदा,
    ज्या दिवशी तुम्ही घेतल्या शपथा,
    तुमचे आमच्या जीवनात एक वेगळे स्थान,
    तुम्हा दोघांना लग्नबंधनाच्या मनापासून शुभेच्छा.

53) Anniversary Caption In Marathi | लग्नवाढदिवसासाठी कॅप्शन्स



लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा तर द्यायच्या आहेत पण जास्त फापटपसारा नको असल्यास नक्की वाचा लग्नदिवसासाठी कॅप्शन्स.


प्रत्येक लव्हस्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर
पण माझी लव्हस्टोरी माझी फेव्हरेट आहे
हॅपी अॅनिव्हर्सरी बायको

 

ज्या व्यक्तीने माझ्या आयुष्याला बनवलं सुंदर,
त्या व्यक्तीला लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा



आकाशातला चंद्र तुझ्या बाहूत असावा
तू जे मागशील तुला मिळावी
तुझ्या डोळ्यातलं प्रत्येक स्वप्नं सत्य व्हावं
नशिबाची प्रत्येक रेघ तुझ्या हातावर असावी
हॅपी एनिव्हर्सरी माय लव्ह
आयुष्य आहे थोडं दुःखदायी
पण एकमेकांची साथ आहे
लढवू किल्ला पूरेपूर
जोपर्यंत एकमेकांची साथ आहे
लग्नवाढदिवसाच्या खूप शुभेच्छा


 

महत्त्व याला नाही की, आपलं एकमत आहे की नाही
महत्त्व याला आहे की, आपल्यात प्रेम आहे की नाही
लग्नाच्या वर्षपूर्तीबद्दल खूप खूप शुभेच्छा
आपलं घर आपल्याशिवाय अपूर्ण आहे
आपल्या मुलांशिवाय कुटुंब अपूर्ण आहे
तुझ्याशिवाय तर माझं आयुष्यच अपूर्ण आहे
हॅपी एनिव्हर्सरी माय लव्ह

 

आपण कितीही भांडलो, अबोला धरला
पण आपल्यातलं प्रेम कायम आहे
प्रिय प्रिये लग्नवाढदिवसाबद्दल अभिनंदन
जगणं काय आहे हे मला शिकवलंस तू
शांत राहून ओठांना हसवलंस तू
मी तर एकटाच निघालो होतो जीवनाच्या मार्गावर
मला भेटून त्याला स्वर्ग बनवलंस तू
लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा

 

नशीब आणि बायकोने कितीही त्रास दिला तरी
तेच सोबत असतात आणि जगणं बदलतात
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद
जीवनाच्या प्रत्येक पावलावर आनंदाने चालत जा.
प्रत्येक बाजूला हास्य पसरत जा.
जन्मोजन्मी हे नातं राहो कायम, प्रेमाचा सुगंधाने आयुष्य राहो असंच कायम.
लग्न वर्धापन दिनाच्या शुभेच्छा.

52) 50th Marriage Anniversary Wishes In Marathi | 50 व्या लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा

लग्नाची गाडी 50 व्या वर्षांपर्यंत पोचणं ही खूप मोठी बाब आहे. मग 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तर द्यायलाच हव्या ना.


  1. प्रत्येक समस्येवरील उत्तर आहात तुम्ही
    प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही
    आम्हा मुलांच्या जीवनाचं सारं आहात तुम्ही
    50 व्या लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा आईबाबा
  2. पृथ्वीवर आईवडीलच आहेत देवासमान
    ज्यांची साथ नसेल सगळं आहे विराण
    हॅपी 50th अॅनिव्हर्सरी मम्मी पप्पा
  3. आम्ही तुम्हाला पाहिलं आहे
    तुमचंच अनुकरण केलं आहे
    जीवनात आम्ही जे आहोत ते
    ते फक्त तुमच्यामुळे आहोत
    50 व्या लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा
  4. दिव्यासारखं प्रकाशमय असो तुमचं आयुष्य
    प्राण आणि श्वासासारखी जोडी असो तुमची
    असेच कायम राहा आमच्यासोबत
    हॅपी अॅनिव्हर्सरी मम्मी पप्पा
  5. समुद्रापेक्षा खोल आहे तुमचं प्रेम
    हिमालयापेक्षा उंच आहे तुमचं प्रेम
    एकमेकांना असंच जपा
    50 व्या लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा
  6. विश्वासाचा दोर घट्ट राहो
    प्रेमाचं नातं अतूट राहो
    वर्षानुवर्ष ही जोडी कायम राहो
    लग्नाच्या गोल्डन ज्युबिलीच्या शुभेच्छा
  7. चेहऱ्यावरचं हसू कायम असू द्या
    प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ द्या
    एकमेंकावर कधीही रूसू नका
    50 वर्ष झाली आतातरी भांडू नका
    लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा आईबाबा
  8. तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव कायम राहो
    देवाचा तुमच्यावर आशिर्वाद राहो
    कुटुंबाचा आधारस्तंभ आहात तुम्ही
    50 नंतर 100 वा लग्नाचा वाढदिवसही लवकर येवो
  9. सप्तपदीने बांधलेलं नातं, आयुष्यभर जपलेलं नातं
    कसा झाला तुमचा 50 वर्षांचा दीर्घ लग्नप्रवास
    हॅपी 50 वेडिंग ईयर्स टू मम्मी पप्पा
  10. विश्वासावर कायम आहे जग
    विश्वासावर कायम आहात तुम्ही
    असाच वाहू दे प्रेमाचा सागर
    हीच प्रार्थना आणि हीच शुभेच्छा
    50 व्या लग्नवाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

50) Aai Baba Anniversary Wishes In Marathi | आई बाबा यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

लग्नाचं नातं अजून पुढच्या पायरीवर नेणारी गोष्ट म्हणजे मुल जन्मणं. मुलांनी आपल्या आईवडिलांना लग्नाच्या वाढदिवसाला दिलेल्या या काही मनाला स्पर्श करणाऱ्या शुभेच्छा.

  1. मिनिट असतं सेकंदाच आणि तास असतो मिनिटांचा
    आम्ही माणसं…. माणसं बनतो ती नात्यांनी,
    आज मी माझ्या आई-बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो
    कारण त्यांनी ना फक्त इतके वर्ष त्यांचं नातं जपलं
    तर माझ्यासारख्या मुलालाही चांगले संस्कार देऊन मोठं केलं
    तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी काय भेट देऊ
    मराठीत प्रेम, हिंदीत प्यार आणि इंग्रजीत लव
  2. तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
    तुम्हाला भरभरून यश मिळो,
    लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !!
    Wishing You a very Happy Wedding Anniversary !!
  3. प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
    प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
    आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही,
    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा.
  4. पृथ्वीवर देवाची ओळख आहेत आईबाबा
    त्यांची सोबत नसती तर सुखांची ओळख कुणी करून दिली असती आम्हाला
    हॅपी एनिव्हर्सरी मम्मी-पप्पा.
  5. आम्ही मुलांनी तुम्हाला एकत्र पाहिलं आहे
    तुमचं प्रेम, तुमचा विश्वास पाहिला आहे
    आयुष्यात बरंच काही तुमच्याकडूनच शिकलो आहे
    तुमची साथ अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो
    लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा.
  6. दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो
    माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो
    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
  7. समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम…
    एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास,
    हॅपी अॅनिव्हर्सरी आईबाबा.
  8. ना कधी हास्य गायब होवो तुमच्या चेहऱ्यावरून,
    तुमची प्रत्येक इच्छा होवो पूर्ण होवो,
    कधीही रागवू नका एकमेकांवर
    लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
  9. तुमच्या आयुष्यात होवो प्रेमाची बरसात,
    देवाचा आशिष राहो तुमच्यावर सदैव,
    दोघांच्या प्रेमाची गाडी अशीच राहो चालत,
    दरवर्षी असाच करा साजरा प्रेमाचा हा उत्सव.
  10. सप्तपदीमध्ये बांधलेलं आहे प्रेमाचं बंधन,
    जन्मभर असचं प्रेमाने बांधलेलं राहो तुमचं नंदनवन,
    कोणाची न लागो त्याला नजर,
    आम्ही सोबत असूच साजरं करायला हजर.

Bottom Add