49) Wedding Anniversary Status In Marathi | लग्न वाढदिवसासाठी स्टेटस

तुमच्या जवळच्या जोडप्याच्या खास दिवशी तुम्हीही सोशल मीडियावर ठेवा हे स्टेटस.

  1. तुम्ही दोघं आहात आमच्यासाठी प्रिय.
    जे आयुष्यात आनंद भरतात.
    तुमची जोडी आहे मेड फॉर इच अदर.
    हॅपी अॅनिव्हर्सरी माय ब्रदर.
  2. ईश्वर करो अशीच येत राहो तुमची अॅनिव्हर्सरी.
    तुमचं नातं गाठो आकाशाची उंची,
    येणारं आयुष्य असो सुखमय,
    घरात राहो आनंदाचा वास,
    सुंगधित होवो येणारा प्रत्येक क्षण खास.
    लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
  3. चांगल्या लोकांचे चांगले क्षण,
    चांगल्या लोकांचा चांगला सहवास,
    तुम्हा दोघांना मनापासून लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा खास.
  4. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
    प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई,
    देव करो तुम्ही राहावं सदा खूष.
    लग्न वाढदिवस हा साजरा होवो खूप खूप.
  5. आज या दिवसाच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ही प्रार्थना करतो की,
    तुमची सर्व स्वप्नं पूर्ण व्हावी. लग्नाच्या वर्षपूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा.
  6. साथीदार जेव्हा सोबत असतो तेव्हा प्रवास छानच होतो.
    तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा साक्षीदार असलेला
    हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
    आनंदाचा हा क्षण वारंवार तुम्हाला जगता येवो.
    हॅपी अॅनिव्हर्सरी स्वीट कपल.
  7. अतूट नातं हे लग्नाचं.. दोन जीवांना प्रेमाच्या बंधनात बांधणारं..
    हीच आहे माझी शुभेच्छा लग्नाच्या वाढदिवसाच्या
    शुभ घडीला सदा कायम राहो सहवास तुमचा.
  8. प्रत्येक ऋतूत तुम्ही भेटत राहा,
    प्रत्येक पावसाचा प्रेम असंच खुलवत राहा.
    प्रत्येक जन्मी प्रेम असंच वाढत राहावं.
    लग्नवर्धापन दिन असाच साजरा होत राहो.
  9. तुम्ही दोघं दिसता सोबत छान,
    असंच एकमेकांवर प्रेम करा आणि
    आधीपेक्षाही एकमेकांवर जास्त प्रेम करा.
  10. प्रार्थना करते की, तुम्हा दोघांमध्ये लग्नाआधी आणि लग्नानंतरही
    अगदी लग्नाच्या पहिल्या दिवशीसारखं प्रेम असावं.
    लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Bottom Add