पती जरी आपल्या लग्नाचा वाढदिवस कधी तरी विसरत असेल पण जेव्हा त्याच्याकडून शुभेच्छा मिळतात तेव्हा त्या खास तर असणारच.
- न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा
यालाच समजून घे माझी शायरी
प्रेमपूर्ण हॅपी अॅनिव्हर्सरी बायको - आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
प्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर
नेहमी हसत राहा येवो कोणताही क्षण
कारण आनंदच घेऊन येईल येणारा प्रत्येक क्षण
हॅपी अॅनिव्हर्सरी बायको - माझा प्रत्येक क्षण तुझ्या नावे आहे
ह्याला फक्त शायरी समजू नकोस
माझ्याकडून तुला हा प्रेमाचा पेैगाम आहे.
हॅपी अॅनिव्हर्सरी प्रिये - माझ्याशी लग्न केल्याबद्दल धन्यवाद
आणि मला एक संधी दिल्याबद्दल, मला हवं तसं जगू देण्याची
आणि मला खात्री आहे की, भविष्यातही हे असंच असेल
चल तर मग साजरा करूया आपल्या लग्नाचा वाढदिवस - मला आजही लक्षात आहे ज्या दिवशी
आपण पहिल्यांदा भेटलो होतो
लग्नदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा - तुमच्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थन करतो की,
आपल्या दोघांना जगातील सर्व सुख, हसू, प्रेम, आनंद
आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो. - तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. - तुझ्या नावाने अनेकांनी तुला हाक मारली असेल,
पण तुझ्या नावासाठी जगणारा एकच आहे,
हॅपी अॅनिव्हर्सरी बायको. - प्रेम म्हणजे फक्त कॅंडललाइट आणि गुलाब नाहीत.
प्रेम म्हणजे रोजचं जगणं एकमेकांशी बोलणं एकमेकांना वेळ देणं
खुल्या मनाने एकमेकांना स्वीकारणं
प्रेम म्हणजे आयुष्यातील खास गोष्टी एकमेकांना सांगणं
हेच प्रेम हेच प्रेम हेच प्रेम
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… - उदास नको होऊस मी तुझ्यासोबत आहे
नजरेपासून दूर पण हृदयाजवळ आहे
डोळे मिटून माझी मनापासून आठवण काढ
तू माझ्यासाठी नेहमीच खास आहेस. लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.