56) Funny Anniversary Wishes In Marathi | लग्नवाढदिवसासाठी मजेशीर शुभेच्छा

मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारताना अनेकदा तुम्ही अनेकदा लग्नविषयावरील अनेक विनोद ऐकले असतीलच ना. तशाच या काही लग्नवाढदिवसाच्या मजेशीर शुभेच्छा. बुरा ना मानो बस एन्जॉय करो.


  1. बायको – आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आज मी चिकन बनवते,
    नवरा – चालेल. पण आपल्या चुकीची शिक्षा चिकनला का देत्येस?
  2. ईश्वराचे आभार माझ्या गोडव्याने, तुम्हाला मधुमेह झाला नाही,
    आपल्या नात्यातील गोडवा असाच वाढत राहो,
    लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  3. मी इतकी आनंदी आहे की,
    जन्मभर सतवण्यासाठी मला हक्काचा साथीदार मिळाला
    हॅप्पी अॅनिव्हर्सरी
  4. लग्न म्हणजे एखाद्या युध्दभूमीसारखे असते
    जिथे तुम्हाला युध्दासाठी सतत तयार राहावे लागते
    लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  5. तुमच्या दोघांची जोडीही देवाची देणगी आहे
    ती प्रेमाने आणि समर्पणाने तुम्ही जपली आहे
    कधी ना कमी होवो तुमच्यातील प्रेमाचा हा बहर,
    लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला पाठवत आहे ट्रकभर.
  6. लग्नाचे दोन महत्वाचे नियम – बायको नेहमी बरोबरच असते
    जेव्हा तुम्हाला वाटेल की ती चुकीची आहे
    तेव्हा स्वःताला मारा आणि पुन्हा पहिला नियम वाचा.
  7. तुझ्या ब्रम्हचर्याला या दिवशीच लागला होता फुलस्टॉप
    लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला मित्रा माझ्या खूप खास.
  8. तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी हीच आहे इच्छा,
    पेट्रोलच्या वाढत्या दराप्रमाणे तुमच्या प्रेमाचा आलेखही उंचावत राहो मित्रा.
  9. लग्नाच्या प्रेमाची गाडी चालते चार पायांवर,
    दुचाकीची चारचाकी होणाच्या
    या दिवसाच्या तुला खूप शुभेच्छा माझ्या मित्रा.
  10. मैत्रिणी तुझ्या नवऱ्याची मीच आहे साली खास,
    लग्नाच्या वाढदिवसाच्या तुला आणि जीजूंना शुभेच्छा एकदम खासमखास.
  11. सप्तपदी चालताना दिलीस मला साथ तशीच साथ
    आता महागाईच्या काळातही देशील ना राणी
    कारण मी तुझा राजा आणि तूच माझी राणी.

Bottom Add