लेक म्हणजे आईबाबाच्या काळजाचा तुकडा…अशा लाडक्या लेकीच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा त्यांना खूपच महत्त्वाच्या असतात. तिच्या वाढदिवसासाठी आमंत्रण सर्वांना देण्यासाठी खास आमंत्रण मेसेज.
1. गुलाबाच्या ओठी आली घेऊन चैतन्याची गाणी
जसं पहाटेचं गोड स्वप्न तशी आमच्या परीच्या जन्माची कहाणी
ही कहाणी तुम्हाला सांगायची आहे,
तिच्या पहिल्या वाढदिवशी यासाठी एक खास कार्यक्रम आयोजित केला आहे.
तेव्हा सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून यायचं हं
दिनांक-
वेळ –
स्थळ –
2. लेक म्हणजे तांबडं कुंदन, लेक म्हणजे हिरवं गोंदण
लेक म्हणजे झाडाची पालवी, लेक म्हणजे सुंगधी चंदन
अशाच आमच्या लाडक्या लेकीचा….चा वाढदिवस साजरा करायचा आहे.
तेव्हा सर्वांना वाढदिवसाचे आग्रहाचे निमंत्रण
दिनांक –
वेळ –
स्थळ –
3. फक्त लेकीलाच समजते निसर्गाची भाषा,
कारण प्रत्येक काळ्या रात्रीला असते पहाटेची आशा
आमच्या लेकीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
हा आनंद द्विगुणित करण्यासाठी साऱ्यांना आग्रहाचे निमंत्रण आहे
दिनांक –
वेळ –
स्थळ –
4. मुलगी म्हणजे अशी एक चिऊताई जी घरभर उडते आणि रागावलं तर कोपऱ्यात रूसून बसते
आमच्या चिऊताईला आता एक वर्ष होत आहे
तिच्या पहिल्या वाढदिवसाचे सर्वांना मनापासून आमंत्रण
सर्वांनी चिऊच्या वाढदिवसाला यायचं हं
दिनांक –
वेळ –
स्थळ –
5. कुशीत माझ्या झोपण्यासाठी ती गाल फुगवून बसते
वाढदिवसाचा फ्रॉक घालून घरभर हिंडते
माझ्या लाडक्या लेकीच्या पाचव्या वाढदिवसाचे आपणा सर्वांना आग्रहाचे आमंत्रण
दिनांक-
वेळ –
स्थळ –