जसे वडील आपला आधार असतात तसेच वडिलांच्या बरोबरच आपले काका देखील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. काका हे दुसरे वडीलच असतात. कधी वडिलांनी रागावले तर काका आपल्याला समजावतात. ते लाड तर करतातच पण प्रसंगी मित्रासारखा अनमोल सल्ला देखील देतात. अशा काकांचा वाढदिवस असेल तर त्यांना आदरयुक्त व प्रेमळ शुभेच्छा देखील पाठवायला हव्या. पाठवा काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश!
परमेश्वराच्या आशीर्वादाने तुमच्या वाढदिवसाचा प्रत्येक क्षण हा एक सण होवो हीच सदिच्छा..काका तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..
काका आपणास दीर्घायुष्य , यश कीर्ती, आरोग्य व समाधानाची प्राप्ती होवो हीच आजच्या दिवशी प्रार्थना! वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छाआयुष्याची सर्व सुखे तुम्हाला मिळोत काका, पण त्याआधी मला पार्टी द्यायला विसरू नका…वाढदिवसाच्या शुभेच्छा काका..
आजच्या तुमच्या वाढदिवशी मिळो तुम्हाला हा उपहार, तुमचा आनंद होवो दुप्पट व तुम्हास सुख समृद्धी ऐश्वर्य मिळो अपार… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका!
आजचा हा विशेष दिवस तुमच्या चेहऱ्यावर सुहास्य निर्माण करो, तुमचा दिवस आनंदाने भरून जावो आणि तुमचे आयुष्य सुखमय होवो हीच इच्छा! काका तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…
काका तुम्ही मला कायम मुलासारखेच प्रेम दिले, मुलाप्रमाणेच जपले. वडिलांप्रमाणेच माझ्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात. तुमच्या या मुलाकडून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
काका, तुम्ही माझे मोठे बाबा असण्यासोबतच एक चांगले मित्र देखील आहात.तुम्हास वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा व नमस्कार…
Heart Touching Birthday Wishes For Uncle In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा
दिवसाची सुरुवात तुमच्या आशीर्वादाने होते, दिवसाचा शेवटही तुमच्या आठवणीने होतो. आयुष्यभर तुमचे प्रेम आम्हाला असेच मिळत राहो.काका तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
कधी समजून घेती, तर कधी शिकवतो, तर कधी ओरडतो.. पण बाबांसारखाच प्रेम करतो खूप! कधी खूप लाड करतो तर कधी मित्राचे घेतो रूप! आज या शुभ दिनी मी परमेश्वराकडे एकच प्रार्थना करतो की तुझ्यासारखा काका जगात सर्वांना मिळावा काका तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
काका तुम्हाला लाभो निरोगी जीवन, दुःखाचा कधी मागमूसही नसो…एवढीच प्रार्थना परमेश्वरास करतो की असे काका प्रत्येकाच्या आयुष्यात असो. प्रिय काका तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझ्या प्रत्येक चांगल्या व वाईट काळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या माझ्या काकांना व काकांच्या रूपात मिळालेल्या दुसऱ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!