भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि काही अनोखे मार्ग शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, भाचीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा. आता सोशल मीडिया असो किंवा तुमचे व्हॉट्सऍप स्टेटस भाचीच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस टाकून तिचा वाढदिवस खास बनवून टाका.
मी रोज देवाचे आभार मानतो कारण त्याने मला एक परीसारखी गोड भाची दिली. माझ्या गोड स्वभावाच्या सुंदर भाचीला मामाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तू माझ्या आयुष्यातली सगळ्यात खास व अनमोल व्यक्ती आहेस. तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाही हा मामा करू शकत नाही. देवाकडे हीच प्रार्थना आहे की माझ्या भाचीला सुखी व यशस्वी आयुष्य लाभो. लाडक्या भाचीला मामाकडून वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…
भाची म्हणजे आयुष्यात आलेली जणू सुंदर परीच आहे. आमची भाची म्हणजे एक गोड बाहुली आहे. माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
तुझ्या बालपणीच्या गमतीजमती आणि सुंदर प्रसंग आठवून आजही आमच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य उमटते. तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप आशीर्वाद आणि लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
यशाची उंच शिखरे तू सर करावी, मागे वळून बघताना आमच्या आशिर्वादाचीही आठवण ठेवावीस, तुझ्या प्रगतीचा वेलू गगनास भिडू दे, तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होऊ दे! लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तू म्हणजे सोनचाफ्याची उमलती कळी , तू म्हणजे मोगऱ्याची नाजूक पाकळी, माझ्या सोनसाखळीला , सोनकळी भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
तुझा हसरा चेहेरा बघितला की माझ्या सर्व चिंता दूर होतात. आयुष्य सुंदर भासू लागते. माझ्या लाडक्या भाचीला मावशीकडून भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
तुला वाढदिवसाला मी काय भेट देणार, देवाने तुला माझ्या आयुष्यात पाठवून मलाच एक सुंदर भेट दिली आहे. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझे आयुष्य सुंदर झाले. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा!
सोनेरी सूर्यकिरणांनी अंगण सजले, फुलांच्या मधुर सुगंधांने वातावरण फुलले, तुझ्या येण्याने आमचे आयुष्य खुलले. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा!
आयुष्यात आमच्या आली एक छोटीशी परी, जिने आमच्या आयुष्याची केली स्वप्ननगरी! आमच्या परीला मिळोत सर्व सुखे हीच सदिच्छा, लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
माझ्या आयुष्यातला निखळ आनंदाचा अव्याहत वाहणारा झरा असलेल्या माझ्या लाडक्या बाहुलीला, माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या आभाळभरून शुभेच्छा!
उंच गगनाला गवसणी घालताना, विसरू नकोस आपल्या मुळांना! आयुष्यात तुला भरभरून यश आणि सुख मिळो व तुझ्या चेहेऱ्यावरचे हसू कायम फुललेले राहो. माझ्या लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
सगळी दुःखे आणि वेदना तुझ्यापासून नेहेमी लांब राहाव्यात आणि तुझ्या आयुष्यात सगळी सुखे असावीत हीच देवाकडे आजच्या खास दिवशी प्रार्थना आहे. लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझी लाडकी भाची म्हणजे बागेत फुलणारे गुलाबाचे फुल नाही तर माझ्या आयुष्यात सुगंध आणणारे देवाघरचे फुल आहे. या सुगंधाने माझ्या आयुष्यात आनंद आला आहे. लाडक्या भाचीला मामा कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्या खांद्यावर बसून फिरायला जाण्यासाठी हट्ट करायचीस, खाऊसाठी गाल फुगवून बसायचीस. तुझ्या या बालपणीच्या आठवणी अजूनही मनात ताज्या आहेत. आजच्या या खास दिवशी मामाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझे छोटेसे पाऊल या घरात पडले आणि या आजोळच्या भिंतींना पुन्हा नव्याने घरपण मिळाले. माझ्या या गोड भाचीला आयुष्यभर सुखी ठेव हीच देवाकडे प्रार्थना आहे. लाडक्या भाचीला वाढदिवसाच्या आभळभरून शुभेच्छा!