प्रत्येक ग्रुपमध्ये एखादा तरी अशी मैत्रीण असतेच जिच्या खाण्याच्या सवयीमुळे ती ग्रुपमध्ये फेमस असते. अशा मैत्रीणीच्या नावे पुढील मजेदार मैत्री हे असे नाते आहे जे प्रत्येकाच्या आयुष्यात येते. हे नाते आयुष्याला सुंदर बनवते. आयुष्यात पैसा भलेही कमी कमावला तरी चालेल, पण जर जिवाभावाचे मित्र कमावले तर ते प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. तुम्हाला आधार देतात. तुमच्या चुका सांगून तुम्हाला वाईट मार्गावर जाण्यापासून रोखतात. तुमच्या पहिल्या प्रेमाचे साक्षीदारही हेच मित्र असतात आणि चुकून हार्टब्रेक झाले तर त्यावेळी तुम्हाला दुःखातून बाहेर काढण्यासाठी हेच मित्र तुमच्या सोबत असतात. तुमचा वाढदिवस असेल तर तुमच्यासाठी काहीतरी खास करणारे हे तुमचे मित्र कुटुंबाचाच एक भाग असतात. मग जर जिवाभावाच्या मित्राचा वाढदिवस असेल तर त्याला खास शुभेच्छा दिल्याचं पाहिजेत. पाठवा मित्राला /मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! (Happy Birthday Wishes In Marathi For Friend).
माझ्या मनाला अवीट आनंद देणारा तुझ्या वाढदिवसाचा दिवस आला की वाटतं तुझ्यासारखा जिवाभावाचा मित्र मिळाल्याने माझे आयुष्य आनंदाने भरलेलं आहे…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोस्ता...!💐💐🎂🎂🎉🎊
जरी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला मला लेट, पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा...!💐💐🎂🎂🎉🎊
अरे वाढदिवस आहे आमच्या भावाचा, अन जल्लोष आहे गावाचा! मित्राच्या रूपात असलेल्या भावाला वाढदिवसाच्या ट्र्कभरून शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी…, हि एकच माझी इच्छा ,तुझ्या भावी जीवनासाठी माझ्या सदिच्छा!, माझ्या लाडक्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
आज देवापुढे हात जोडून मी एकच आशीर्वाद मागतो की, हे देवा माझ्यासाठी अनमोल असणाऱ्या या व्यक्तीला, आजच्या सुवर्णदिनी अनंत सुखे द्यावीत, प्रिय मैत्रीणीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
Heart Touching Birthday Wishes In Marathi For Best Friend | Birthday Wishes In Marathi
आयुष्याच्या या पायरीवर तुझ्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे, तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे, तुला उदंड आयुष्य लाभू दे हीच सदिच्छा! प्रिय मित्रास वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
मी आशा करतो कि तुझा हा खास दिवस, स्वकीयांचे प्रेम आणि हास्याने भरलेला जावो व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. माझ्या लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी तुझी सारी स्वप्नं साकार व्हावी, आजचा वाढदिवस तुझ्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणींनी तुझे आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
नवे क्षितिज नवी पहाट, फुलावी तुझ्या आयुष्यातील स्वप्नांची वाट.. स्मित हास्य तुझ्या चेहेऱ्यावर राहो, तुमच्या पाठीशी परमेश्वराचा आशीर्वाद सदैव राहो. लाडक्या मैत्रीणीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
शिखरे उत्कर्षाची सर तू करीत रहावी !, कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !,
तुझ्या सर्व इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !, तुझ्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !,
तुला दीर्घायुष्य लाभो ही इच्छा !, मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये, म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!,
यशस्वी व औक्षवंत हो!,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
प्रेमाच्या या नात्याला,
विश्वासाने जपून ठेवतो आहे,
वाढदिवस तुझा असला तरी,
आज मी पोटभर जेवतो आहे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Girl
जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा!!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
आयुष्यात सगळी सुख तुला मिळो, फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो, हीच आज देवाकडे मागणी आहे माझी, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊