आपल्या लाडक्या लेकीचा, परीचा वाढदिवस जणू सोहळाच नाही का, लेकीच्या रूपात घरात लक्ष्मी येतं असं म्हणतात. लेक आणि बाबाचं, लेक आणि आईचं नातं नेहमीच खास असतं. अशा तुमच्या लाडक्या लेकीच्या वाढदिवसानिमित्त या खास शुभेच्छा(Birthday Wishes For Daughter In Marathi).
ज्या दिवशी तुझा जन्म झाला, तो क्षण आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा क्षण होता. या अनमोल क्षणाबद्दल आम्ही परमेश्वराचे कायम ऋणी राहू… बेटा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, तुझ्या पंखानी आकाशात उंच भरारी घेऊ दे. तुला उदंड आयुष्य लाभू दे. हिच परमेश्वर चरणी प्रार्थना, तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
माझे जग तू आहेस, माझे सुख तू आहेस, माझ्या जीवनाच्या वाटेवरील तू अखंड प्रकाश आहे, माझ्या जीवनाचा तूच खरा अर्थ आहेस. तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ...!💐💐🎂🎂🎉🎊
माझ्या जीवनात आलेली सुंदर परी आहेस तू… तुझ्या बाबांचा आणि माझा पंचप्राण आहेस तू… पिल्लू तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ...!💐💐🎂🎂🎉🎊
पोटी एक तरी मुलगी जन्माला यावी, जिच्यासाठी गावभर बर्फी वाटावी, कधी तरी कच्ची पक्की पोळी भरवून तिने तिच्या बाबाला भरवावी… वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बच्चा ...!💐💐🎂🎂🎉🎊
माझ्या प्रिय परीला वाढदिवसाच्या आनंदमयी लाखो शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाची उधळण, चल केक कापूया आणि साजरा करू हा सुंदर दिवस...!💐💐🎂🎂🎉🎊
तुझ्यामुळे आम्हाला हसण्यासाठी हजार संधी मिळाल्या आणि पुढेही मिळतील प्रिय परी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
माझ्या मुलीचा वाढदिवस माझ्या कुटुंबासाठी पर्वणी आहे. हॅपी बर्थडे बेटा...!💐💐🎂🎂🎉🎊
तुझ्या वाढदिवसाची आठवण नेहमीच येते छकुली, आज तू लांब आहेस पण मनाच्या जवळ आहेस. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा, तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा… तुझं आमच्या आयुष्यात असणं म्हणजे उन्हामधल्या श्रावणधारा… वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
मूठ आवळून तू माझं बोट पकडलंस तो क्षण खास होता, तुझ्या येण्यानेच मला जग जिंकल्याचा भास झाला… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
कधी रूसतेस, कधी हसतेस, रूसवा काढण्यासाठी मला तुझ्या मागे मागे फिरवतेस… पण लेक म्हणून तू मला आयुष्यभर सुख देतेस… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
बोलक्या तुझ्या स्वभावाने थकवा माझा पळून जातो. तुला पाहताच क्षणी मी तुझ्यात हरवून जातो. माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
आभाळाएवढं सुख कशाला म्हणतात ते मुलगी झाल्यावर कळतं, एक वेगळंच आपलेपण मला तुझ्या हास्यात जाणवतं. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊