नातवंड आणि आजोबांचं नातं हे दूध आणि सायीसारखं असतं. दूध आटल्याशिवाय साय घट्ट होत नाही. म्हणूनच ते तितकंच खास असतं. अशा तुमच्या प्रेमळ आजोबांच्या वाढदिवसासाठी या काही खास शुभेच्छा !
आजचा दिवस खूप खास आहे, कारण माझ्या आयुष्यातील स्पेशल व्यक्तीचा आज वाढदिवस आहे, माझ्या लाडक्या आजोबांना, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
तुम्ही नेहमी आनंदी राहावे, तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असावेत हिच प्रार्थना…, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आजोबा परमेश्वराकडून मिळालेलं एक, खास गिफ्ट आहात तुम्ही माझ्यासाठी...!💐💐🎂🎂🎉🎊
लहानपणी तुमच्यासोबत घालवलेले क्षण आजही आठवतात, पुढच्या जन्मीही आजोबा म्हणून मला तुम्हीच हवे आहात…, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
आजी आणि आजोबा म्हणजे ताटातल्या लोणच्यासारखी असतात, थोडीच लाभतात पण अख्ख्या जेवणाची गोडी वाढवतात, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा...!💐💐🎂🎂🎉🎊
आमच्या कुटुंबाचे आधार आणि अनुभवांचे भांडार, अशा माझ्या लाडक्या आजोबांना, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
नातवाचे पहिले मित्र म्हणजे आजोबा, काळजात प्रेमाची खाण म्हणजे आजोबा, जरी न लाभला सहवास जास्त तरी जीवाचा जीव असतात आजोबा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
आजी शिवाय घरात संस्कार नाहीत, आजोबांशिवाय जगण्यात मजा नाही, जिथे आजी आजोबा नाहीत तो चार भिंतीचा फ्लॅट पण घर नाही, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा...!💐💐🎂🎂🎉🎊
संस्काराचे गाठोडे त्यांच्या सोबतीला, अनुभवाचे सारे बोल उगमतात जीवनाला, असे माझे आजोबा कायम हवेत मला… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊
कितीही चिडले तरी माझ्यावर प्रेम करायचं सोडत नाहीत, आजोबा म्हणूनच तुमच्याशिवाय जीवनात आनंदच येत नाही, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!💐💐🎂🎂🎉🎊