प्रेयसी ही भावी जीवनसाथी असते. प्रियकर प्रेयसीचे नाते हे खूप नाजूक, तरल आणि गोड असते. प्रेयसी ही प्रियकरावर संपूर्ण विश्वास ठेवून त्याच्याशी जन्मोजन्मीचे नाते जोडण्याची स्वप्ने पाहते. ती बायको झालेली नसली तरीही जीवनसंगिनी प्रमाणेच काळजी घेते, प्रेम करते. तुमच्यासाठी तिचा जीव तुटतो. तुमच्या यशासाठी, आरोग्यासाठी ती नेहेमीच प्रार्थना करते. मग प्रियकराने देखील तिची अशीच काळजी घ्यायला हवी, हो की नाही? अशा प्रिय प्रेयसीचा वाढदिवस असेल तर मग प्रियकराने खास शुभेच्छा द्यायलाच हव्या. किंबहुना हा तिचा हक्कच आहे की तुम्ही तिचा हा खास दिवस तिच्यासाठी अजून खास बनवावा. पाठवा लाडक्या प्रेयसीसाठी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.
तुझी माझी साथ ही जन्मा-जन्माची असावी, माझ्या शेजारी उभी राहून तू बायको माझी शोभावी, माझी ही प्रार्थना देवाने पूर्ण करावी, जन्मोजन्मी मला तूच भेटावी. खास व्यक्तीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा…
साथ माझी तुला प्रिये, शेवटच्या श्वासापर्यंत असेल…नाही सोडणार हात तुझा, जोपर्यंत प्राण माझ्यात असेल… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जन्मो जन्मीआपले नाते असेच अतूट राहावे. आनंदाचे सप्तरंग जीवनात यावे. हीच आहे आजच्या खास दिवशी सदिच्छा, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
मिठी या शब्दातच केवढी मिठास आहे. हा शब्द नुसता उच्चारला तरी त्यात कृतीचा भास आहे. Happy Birthday My Love
आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे,व आयुष्यभर तू माझ्याबरोबर असावे हीच माझी इच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy Birthday Sweetheart
ज्या दिवशी तुला प्रथम पाहिले आजही तो दिवस मला लख्ख आठवतो, माझ्या मनाच्या वाळवंटामध्ये तुझ्या रूपाने जणू गुलाबाची कळी फुलली! Happy Birthday My Love
आकाशात हजारो तारे असतील पण चंद्रासारखे कोणीच नाही. लाखो सुंदर चेहरे दिसतात रोज पण तुझ्यासारखे कोणी नाही. वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट.
माझ्या चेहर्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुझी सगळी स्वप्ने, इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात तुझ्यापासून होते आणि शेवट तुझ्याच नावाने होतो. माझ्या आयुष्यातील तुझे स्थान नेहमीच सगळ्यात खास राहील. Happy Birthday Dear
जगातील सगळ्यात सुंदर, सगळ्यात गोड आणि सगळ्यात निरागस मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तू मला मिळालीस यासाठी ईश्वराचे मी मानावे तेवढे आभार कमी आहेत. Happy Birthday My Love
माझी अशी प्रार्थना आहे की,
तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो.
जे आत्तापर्यंत ते नाही मिळालं
ते सर्व सुख तुला मिळो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे.
सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे,
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा.
सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ,
पक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ
आणि तुझ्या हास्याने सुंदर होईल
आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ
आजचा दिवस खास आहे,
ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे.
कारणच तसं आहे ना.. आज तुझा वाढदिवस आहे.
हॅपी बर्थडे सखे.
चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा…
असाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
हे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख,
दरवर्षी असाच साजरा होऊ दे
हा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस.