21) Birthday Wishes For Boyfriend In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रियकरासाठी

 

Birthday Wishes For Boyfriend In Marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रियकरासाठी

प्रियकर प्रेयसी हे नाते खूप खास असते. जरी हे नाते रक्ताचे नसले तरीही ते तितकेच जवळचे असते. प्रियकरासाठी त्याची प्रेयसी हे त्याचे पूर्ण जग असते. तिच्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. जगातली सगळी दुःखे स्वतःवर झेलून प्रेयसीला फक्त आनंदच देणे हे तो स्वतःचे कर्तव्य समजतो. प्रेयसीला तो भावी जीवनसंगिनी समजतो. प्रियकरासाठी त्याची प्रेयसी म्हणजे त्याचा एक अलवार सुगंधी तरल कोपरा असतो जिथे तो त्याचे मन मोकळे करू शकतो. अशा तुमच्यासाठी झटणाऱ्या, तुमच्या सुखासाठी वाटेल ते करण्याची तयारी असणाऱ्या प्रियकरावर तुम्हीही तितकेच प्रेम करत असाल ना! मग हे प्रेम त्याच्यापर्यंत पोचवले पाहिजे.  खास करून जेव्हा या खास व्यक्तीचा वाढदिवस असेल तेव्हा तर  हे प्रेम व्यक्त केलेच पाहिजे. तुम्हाला जर तुमचे प्रेम व्यक्त करण्यास शब्द सापडत नसतील तर आम्ही तुमच्या मदतीला आहोतच! वाचा बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे खास संदेश आणि पाठवा आपल्या प्रियकराला प्रेममय शुभेच्छा! प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या मनापासून.

आयुष्यात चांगले मित्र येतील आणि जातील,पण तू नक्कीच माझा खास आणि जिवाभावाचा सखा व सोबती आहेस. 

तुझ्यापेक्षा जास्त इतर कोणीही मला चांगले समजून घेत नाही. मी खूप नशीबवान आहे कारण तू माझ्या जीवनात आहेस… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जगात सर्वात सुंदर मन असलेल्या व्यक्तीला, विश्वासू मित्र आणि माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

जगातील सर्वात मोहक, आकर्षक,मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी असणाऱ्या माझ्या सर्वात जवळच्या मित्राला, माझ्या प्रिय प्रियकराला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..

जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजूतदार व्यक्तीला माझ्या आयुष्यात माझा प्रियकर आणि भावी जीवनसाथी म्हणून दिल्याबद्दल परमेश्वराचे अनंत आभार… अशा जगातील सगळ्यात शांत आणि गोड व्यक्तीला , माझ्या स्वीट हार्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा… 


Bottom Add