25) Birthday Status In Marathi | वाढदिवसासाठी खास स्टेट्स

 आजकाल प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खास वॉट्सअप, सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्यात येतात. त्यासाठी खास स्टेटस (Happy Birthday Status In Marathi)

1) दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..
हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं
ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व
रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा

2) आयुष्यातील प्रत्येक परीक्षेत अव्वल ये
आणि खूप खूप मोठा हो
वाढदिवसाच्या उशिराने का होईना
खूप खूप शुभेच्छा

3) सूर्य घेऊन आला प्रकाश
चिमण्यांनी गायलं गाणं
फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा जन्मदिवस आला
हॅपी बर्थडे

4) हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत
चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत
जसा सूर्य चमकतो आकाशात
तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

5) तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा
एकदंरीत तुझं आयुष्यचं एक अनमोल आदर्श बनावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

6) आजची तारीख शतदा यावी
ईश्वर चरणी हिच मागणी
सुखशांतीने समृ्द्ध व्हावा सुखाचा ठेवा
मनोमनी साठवाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

7) जीवेत शरदम् शतम्
आपणास आपल्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

8) आज अशी इच्छा आहे की,
तू घराबाहेर पडावंस आणि
संपूर्ण जगाने तुझा वाढदिवस साजरा करावा हॅपी बर्थडे

9) वाढदिवसाचा हा आनंद काही एक दिवसापुरता नाही, त्यामुळे काल जमलं नाहीतरी आजही तो आनंद कायम आहे तुझ्या वाढदिवसाचा. हॅपी बर्थडे

10) दिवस आहे आज खास, तुला उदंड आयुष्य लाभो, हाच मनी आहे ध्यास….वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

Bottom Add