32) Birthday Invitation Msg In Marathi | वाढदिवसाचे आमंत्रण संदेश मराठीत
माझ्या वाढदिवसाचा आनंद माझ्या मित्राशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे माझ्या बर्थडेपार्टीला तुम्ही यायलाचं हवं.
आयुष्यात प्रत्येक छोटी गोष्ट महत्त्वपूर्ण आहे आणि त्यातील एक म्हणजे माझा मित्रपरिवार व कुटुंब. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुमची उपस्थिती ही असलीच पाहिजे. नक्की या आजच्या बर्थडे सेलिब्रेशनला.
जेव्हा मी माझ्या आवडत्या व्यक्तींच्या सान्निध्यात असतो तेव्हा मी नक्कीच आनंदी असतो. असाच आजचा दिवस माझ्या वाढदिवसाचा आणि त्याला तुम्ही आलंच पाहिजे.
उद्या माझा वाढदिवस आहे आणि माझ्या या जन्मदिवसाच्या जल्लोषात तुम्ही सामील व्हायला हवं. मग नक्की या धमाल करू आणि वाढदिवस अविस्मरणीय ठरवूया.
उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. या दिवसाच्या आनंद सोहळ्यात तुम्हीही सामील व्हावं असं मला वाटतं. त्यामुळे उद्या संध्याकाळी या सोहळ्याला नक्की या.
प्रत्येक चांगल्या सेलिब्रेशनची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या व्यक्तींची सोबत असते. त्याला अपवाद माझं बर्थडे सेलिब्रेशन कसं असेल. मग उद्या माझ्या बर्थडे सेलिब्रेशनला नक्की या.
खूप मजा-मस्ती आणि आनंदाचा कल्ला करूया.वाढदिवस तुमच्या भावाचा मग आलं तर पाहिजेच.
माझ्या मित्रांसारखं कोणीच नाही. मग त्यांची उपस्थिती बर्थडेला पाहिजेच. माझ्या बर्थडे सेलिब्रेशनला उद्या नक्की या.
तुझी प्रत्येक गोष्ट आहे मोतीसमान, तू माझ्या वाढदिवसाला आलास तर माझ्या पार्टीमध्ये येईल जान.
चीअर्स करण्याची वेळ तेव्हाच जेव्हा फ्रेंड्स असतील. मग लेट्स पार्टी आणि हॅव फन.