वाढदिवसाचे निमंत्रण पत्रिका स्वरूपात दिलं जातं. मात्र आजकालच्या आधुनिक युगात तुम्ही व्हॉट्सअॅपवर आकर्षक मेजेस पाठवूनही तुमच्या मित्रमैत्रिणींना आमंत्रित करू शकता. यासाठी खास व्हॉट्सअपवर पाठवण्याचे वाढदिवसाचे आमंत्रण मेसेज
1. फुले बहरत राहो तिच्या वाटेत, हास्य चकाकत राहो तिच्या चेहऱ्यात, प्रत्येक क्षण मिळो तिला आनंदाचा हिच इच्छा देवा परमेश्वराला. माझ्या आईच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
दिनांक-
वेळ –
स्थळ –
2. वादळाला त्याचा परिचय देण्याची गरज नसते, कारण त्याची चर्चा त्याच्या येण्यानेच होते. असं वादळी व्यक्तिमत्त्व असलेल्या माझ्या भावाच्या वाढदिवसाचे खास आमंत्रण.
दिनांक-
वेळ –
स्थळ –
3. वाढदिवस येतो आणि मित्र आणि स्नेहींचे प्रेम देत जातो… यंदाच्या वाढदिवशी मला असंच तुमचं प्रेम हवं आहे तेव्हा माझ्या जीवलग मित्रांना कार्यक्रमाचे खास निमंत्रण आहे.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
4. जल्लोष आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा…. मिळून साजरा करण्यासाठी निमंत्रण आहे तुम्हा साऱ्यांना.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
5. आयुष्याच्या या पायरीवर तिला जगातील सारी सुखे मिळावी, मनात आमच्या एकच इच्छा तिच्या साठीला सारी भावंडे एकत्र यावी
आईच्या साठीचे खास निमंत्रण
दिनांक –
वेळ –
स्थळ –
6. उगवता सूर्य जेव्हा प्रखर तेज देतो तेव्हा सूर्यफुल बहरून येतं… तसंच माझ्या वाढदिवशी तुमचे आर्शीवाद मला सूर्य किरणासारखे मिळावेत आणि माझे आयुष्य बहरून यावे असं वाटत आहे.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
7. तुमचे माझ्यावर असलेले प्रेम शब्दात वर्णन करता येणार नाही…पण त्याची गोडी भेटून नक्कीच चाखता येईल. तेव्हा माझ्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी सर्वांनी नक्की यायचं आहे.
दिनांक –
वेळ –
स्थळ –
8. मला वाढदिवसाचं गिफ्ट आणि शुभेच्छा म्हणून खरंच काही नको फक्त या आणि माझा आनंद द्विगुणित करा यातंच मला खरं समाधान आहे.
दिनांक-
वेळ-
स्थळ –