वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक आनंदाचा दिवस असतो. स्वतःप्रमाणेच पती अथवा पत्नी, आईवडिलांचा अथवा मुलांचा वाढदिवसही सर्वांसोबत साजरा करावा असं प्रत्येकाला वाटत असतं. खास करून लग्नाचा पहिला अथवा पंचविसावा वाढदिवस, मुलांचा पहिला वाढदिवस अथवा पाचवा वाढदिवस, आईवडिलांची साठी अथवा सत्तरी असे काही वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. अशा शुभ प्रसंगी आपले नातेवाईक, लाडक्या बहिणीला, मित्रमंडळी आणि जीवलग माणसं तुमच्या जवळ असावी, त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद द्यावेत, असं तुम्हाला वाटत असतं. मग या सर्व मंडळींना आमंत्रण देण्याची लगबग सुरू होते. तुमच्या घरीदेखील वाढदिवसाचं असं सेलिब्रेशन होणार असेल तर मित्रमंडळी आणि नातेवाईकांना असे पाठवा वाढदिवसाचे निमंत्रण संदेश (Birthday Invitation In Marathi) प्रियजनांना आमंत्रण देण्यासाठी बेस्ट आहेत हे वाढदिवस निमंत्रण पत्रिका मराठीतून आणि वाढदिवस निमंत्रण पत्रिका मजकूर.
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा देण्यासाठी हवेत माणसं सारी सोनेरी…,
आईच्या साठाव्या वाढदिवाशी सोबत असावी सारी नातीगोती…,
हा क्षण साजरा करण्यासाठी आम्हा कुटुंबाकडून आपणांस आग्रहाचे निमंत्रण,
दिनांक-
वेळ –
स्थळ-
क्षण हा सुखाचा येतो प्रत्येक वर्षी…,
पण मला मात्र तेव्हा साथ हवी असते फक्त तुम्हा सर्वांची,
माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या सर्व जीवलग मित्रांना आग्रहाचे आमंत्रण,
दिनांक-
वेळ-
स्थळ-
वडाचं झाड मोठं होताना पारंब्यांना वाढवत जातं…,
म्हणूनच बळकट झाल्यावर त्या पारंब्याच वडाचा आधार होतात,
आमच्या कुटुंबातील आधारवड आमच्या बाबांनी जोडलेल्या सर्व पारंब्यांना बाबांच्या साठीनिमित्त आग्रहाचे निमंत्रण…,
आज त्यांना तुमच्या शुभेच्छा आणि आधाराची सर्वात जास्त गरज आहे,
तेव्हा सर्वांना हा आनंद साजरा करण्यासाठी यायचं हं.....,
दिनांक –
वेळ –
स्थळ –
वाढदिवस साजरा करणं म्हणजे फक्त एक बहाणा असतो…,
खरं तर त्या निमित्ताने मला तुम्हाला भेटण्याचा सण साजरा करायचा असतो…,
माझ्या चाळिसाव्या वाढदिवसाचे आग्रहाचे निमंत्रण,
दिनांक –
वेळ –
स्थळ –
दिवस हा सौख्याचा आयुष्यभर साजरा करायचा आहे,
माझ्या चिरंजीवाच्या वाढदिवसाचा आनंद तुमच्यासोबत शेअर करायचा आहे,
चि…. च्या सोळाव्या वाढदिवसाचे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण,
दिनांक-
वेळ –
स्थळ-
माझी परी,
माझी सोनुली…,
बघता बघता दोन वर्षांची झाली,
वाढदिवसानिमित्त आयोजित केला आहे एक बेत…,
ज्याचे आमंत्रण आहे तुम्हा सर्वांना थेट,
दिनांक –
वेळ-
स्थळ –
जिच्या पोटी जन्म घेतो तीच वाढवते सांभाळते,
पिलांसाठी सुगरण आपला जीव झाडाला टांगते,
माझ्या माऊलीने घेतले कष्ट आणि सोसले हाल,
पण राजासारखं वाढवून मला केलं मालामाल,
आता माझी आहे पाळी काहीतरी करण्याची तिच्यासाठी,
थाटामाटात करण्याची इच्छा आहे तिची साठी,
तेव्हा आपण सर्वांनी यावे हे निमंत्रण आग्रहाचे,
आलात तर वाटेल तिला आहे जगात कुणीतरी तिचे हक्काचे,
दिनांक –
वेळ –
स्थळ –
तुमचे येणे तिच्यासाठी खूप आहे महत्त्वाचे,
कारण तुमच्या शिवाय नाही तिचे,
आणखी कोणी जीवाभावाचे,
आईच्या वाढदिवसाचे आमंत्रण,
दिनांक-
वेळ –
स्थळ-
मित्रांच्या येण्याने अंगात संचारतो उत्साह,
पाहताच तुम्हाला विसरतो मी दुःखाचा दाह,
या मित्रांच्या हाकेला ओ द्यायला विसरू नका,
माझ्या वाढदिवसाच्या दिवशी थोडासा वेळ बाजूला ठेवा,
दिनांक –
वेळ-
स्थळ-
परीच्या येण्याने घरी झाला आनंदी आनंद,
एक वर्ष पूर्तीचा साजरा करायचा आहे तुमच्या संग,
तेव्हा सर्वांनी वाढदिवसाला यायचं आहे पक्कं,
भेटवस्तू न आणता सोबत आणायचं फक्त शुभेच्छाचं देणं,
दिनांक –
वेळ –
स्थळ –