प्रिय पत्नी जी आपलं घर सोडून नवऱ्यासाठी सासरी येते. तिच्यासाठी या नात्याला सुरूवात झालेला लग्नाचा दिवस हा अविस्मरणीय असतो. तुम्हीही द्या आपल्या पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा (anniversary wishes in marathi for husband).
- आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे.
आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना
आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. - दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे,
हे नातं असंच तेवत राहावं ही इच्छा आहे.
हॅपी अॅनिव्हर्सरी. - हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… - एकमेकांबरोबर घालवलेल्या सर्वोत्तम वर्षांसाठी
धन्यवाद पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा - इतक्या वर्षानंतरही…
आजही माझ्या आयुष्यातील
सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस
आज आणि नेहमीच
लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - I Love You हे फक्त तीन शब्द आहेत
जे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेत
जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे
तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस.
हॅपी अॅनिव्हर्सरी - कसे गेले वर्ष कळलंच नाही.
लोक म्हणतात लग्नानंतर माणसं बदलतात.
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. - पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात,
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी,
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती झाल्या त्या भेटीगाठी,
सहवासातील गोड-कडू आठवणी, एकमेकांवरील विश्वासाची सावली,
आयुष्यभर राहतील सोबती, लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी. लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा