भावाचं स्थान आपल्या मनात कायम महत्त्वाचं असतं. लाडक्या भावाच्या लग्नासाठी नवरदेवाचे उखाणे शोधण्यापासून आपण तयारी केलेली असते. मग लाडक्या भावाच्या आणि वहिनीच्या लग्न वाढदिवसाला शुभेच्छा तर द्यायला हव्यात. खास लग्न वाढदिवस शुभेच्छा भावासाठी आणि वहिनीसाठी.
तुमची जोडी कधी नये तुटू
देव करो तुम्ही एकमेंकावर नका रूसू
असेच एकत्र राहा आणि आयुष्याचा आनंद घ्या
लग्न वाढदिवसाच्या खूपखूप शुभेच्छा दादा वहिनीफुलांसारखे सुंदर दिसता प्रेमाच्या बागेत
दोघं छान दिसता एकमेकांच्या कवेत
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा आणि वहिनीतुम्ही एकमेकांच्या आयुष्याला सुंदर केलंत
लग्नवाढदिवस धुमधडाक्यात करा
कारण नात्याचं रूपांतर तुम्ही प्रेमात केलंत
हॅपी अॅनिव्हर्सरी दादा वहिनीजीवनाच्या प्रत्येक क्षणात एकमेकांना आनंद द्या
जिथे दुःख जाणवणार नाही असा सहवास द्या
लग्नदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा वहिनीतुम्हाला लाख लाख शुभेच्छा
आजच झाला होता हा सोहळा
लगीनघाई करून दादाने आणलं
वहिनीला घरी आणि उडाली आनंदाची कारंजी
लग्न वाढदिवस खूप खूप शुभेच्छा दादा वहिनीजीवनाच्या प्रत्येक वळणावर असेच सोबत राहा
एकमेंकाना आनंद द्या आणि सुखी राहा
लग्नवाढदिवसाचा सोहळा होवो वारंवार
हॅपी अॅनिव्हर्सरी दादा वहिनीलग्नवाढदिवसाबद्दल तुम्हाला शुभेच्छा
कारण तुमच्यासारखे लोकं असतात कमी
जे असतात सदैव सुखी Happy Anniversaryदेवाने जोडी बनवली आहे ही खास
असं वाढत राहून प्रेमाचं हे झाड
माझ्याकडून तुम्हा दोघांना
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छादिवा आणि वातीसारखं तुमचं नातं
नातं हे असंच वृद्धींगत होत रहावं
माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे
लग्नवाढदिवसाबद्दल अभिनंदन दादा वहिनीआला तो सुदिन पुनः एकदा,
ज्या दिवशी तुम्ही घेतल्या शपथा,
तुमचे आमच्या जीवनात एक वेगळे स्थान,
तुम्हा दोघांना लग्नबंधनाच्या मनापासून शुभेच्छा.