प्रत्येक लव्हस्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर
पण माझी लव्हस्टोरी माझी फेव्हरेट आहे
हॅपी अॅनिव्हर्सरी बायको
ज्या व्यक्तीने माझ्या आयुष्याला बनवलं सुंदर,
त्या व्यक्तीला लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा
आकाशातला चंद्र तुझ्या बाहूत असावा
तू जे मागशील तुला मिळावी
तुझ्या डोळ्यातलं प्रत्येक स्वप्नं सत्य व्हावं
नशिबाची प्रत्येक रेघ तुझ्या हातावर असावी
हॅपी एनिव्हर्सरी माय लव्ह
आयुष्य आहे थोडं दुःखदायी
पण एकमेकांची साथ आहे
लढवू किल्ला पूरेपूर
जोपर्यंत एकमेकांची साथ आहे
लग्नवाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
महत्त्व याला नाही की, आपलं एकमत आहे की नाही
महत्त्व याला आहे की, आपल्यात प्रेम आहे की नाही
लग्नाच्या वर्षपूर्तीबद्दल खूप खूप शुभेच्छा
आपलं घर आपल्याशिवाय अपूर्ण आहे
आपल्या मुलांशिवाय कुटुंब अपूर्ण आहे
तुझ्याशिवाय तर माझं आयुष्यच अपूर्ण आहे
हॅपी एनिव्हर्सरी माय लव्ह
आपण कितीही भांडलो, अबोला धरला
पण आपल्यातलं प्रेम कायम आहे
प्रिय प्रिये लग्नवाढदिवसाबद्दल अभिनंदन
जगणं काय आहे हे मला शिकवलंस तू
शांत राहून ओठांना हसवलंस तू
मी तर एकटाच निघालो होतो जीवनाच्या मार्गावर
मला भेटून त्याला स्वर्ग बनवलंस तू
लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा
नशीब आणि बायकोने कितीही त्रास दिला तरी
तेच सोबत असतात आणि जगणं बदलतात
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद
जीवनाच्या प्रत्येक पावलावर आनंदाने चालत जा.
प्रत्येक बाजूला हास्य पसरत जा.
जन्मोजन्मी हे नातं राहो कायम, प्रेमाचा सुगंधाने आयुष्य राहो असंच कायम.
लग्न वर्धापन दिनाच्या शुभेच्छा.