लग्नाचं नातं अजून पुढच्या पायरीवर नेणारी गोष्ट म्हणजे मुल जन्मणं. मुलांनी आपल्या आईवडिलांना लग्नाच्या वाढदिवसाला दिलेल्या या काही मनाला स्पर्श करणाऱ्या शुभेच्छा.
- मिनिट असतं सेकंदाच आणि तास असतो मिनिटांचा
आम्ही माणसं…. माणसं बनतो ती नात्यांनी,
आज मी माझ्या आई-बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो
कारण त्यांनी ना फक्त इतके वर्ष त्यांचं नातं जपलं
तर माझ्यासारख्या मुलालाही चांगले संस्कार देऊन मोठं केलं
तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी काय भेट देऊ
मराठीत प्रेम, हिंदीत प्यार आणि इंग्रजीत लव - तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
तुम्हाला भरभरून यश मिळो,
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !!
Wishing You a very Happy Wedding Anniversary !! - प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा. - पृथ्वीवर देवाची ओळख आहेत आईबाबा
त्यांची सोबत नसती तर सुखांची ओळख कुणी करून दिली असती आम्हाला
हॅपी एनिव्हर्सरी मम्मी-पप्पा. - आम्ही मुलांनी तुम्हाला एकत्र पाहिलं आहे
तुमचं प्रेम, तुमचा विश्वास पाहिला आहे
आयुष्यात बरंच काही तुमच्याकडूनच शिकलो आहे
तुमची साथ अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो
लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा. - दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा - समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम…
एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास,
हॅपी अॅनिव्हर्सरी आईबाबा. - ना कधी हास्य गायब होवो तुमच्या चेहऱ्यावरून,
तुमची प्रत्येक इच्छा होवो पूर्ण होवो,
कधीही रागवू नका एकमेकांवर
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. - तुमच्या आयुष्यात होवो प्रेमाची बरसात,
देवाचा आशिष राहो तुमच्यावर सदैव,
दोघांच्या प्रेमाची गाडी अशीच राहो चालत,
दरवर्षी असाच करा साजरा प्रेमाचा हा उत्सव. - सप्तपदीमध्ये बांधलेलं आहे प्रेमाचं बंधन,
जन्मभर असचं प्रेमाने बांधलेलं राहो तुमचं नंदनवन,
कोणाची न लागो त्याला नजर,
आम्ही सोबत असूच साजरं करायला हजर.