पहिल्याप्रमाणेच मुलांचा पाचवा आणि दहावा वाढदिवसही मोठ्या धुमधडाक्यात केला जातो. तुमच्या मुलांचा पाचवा वाढदिवस जवळ आला असेल आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांना आमंत्रण द्यायचं असेल हे पाचवा वाढदिवस निमंत्रण पत्रिका अवश्य पाहा.
1. आमच्या येथे….. कृपेने आमचा पुत्र…. याचा पाचवा वाढदिवस समारंभ …. दिनांक…. रोजी…. सायं… वा. करण्याचे योजिले आहे. तरी आपण सहपरिवार उपस्थित राहून बालकास शुभार्शीवाद द्यावेत… ही नम्र विनंती!
निमंत्रक –
पत्ता-
2. चिं….याचा पाचवा वाढदिवस … दिनांक…. सायं…. वा. करण्याचे योजिले आहे. तरी आपण उपस्थित राहून या मंगल कार्याची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.
स्थळ-
आपले नम्र-
3. आमची लाडकी कन्या …. हिचा पहिला वाढदिवस…. दिनांक….. रोजी ….. वा. साजरा करण्याचे योजिले आहे. तरी आपण सर्वांनी सहपरिवार उपस्थित राहून शुभेच्छा आणि आर्शीवाद द्यावे ही विनंती
4. पाचवा वाढदिवस
पाच वर्षांपूर्वी आमच्या… ने घरात येऊन घराला चैतन्यमय बनवलं
आम्ही सुखाने हुरळून आनंदाने बहरून निघालो
बघता बघता आमची चिमुकली कधी पाच वर्षांची झाली हे कळलं सुद्धा नाही
आता पुढील वाटचालीसाठी तिला तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि शुभेच्छांची गरज आहे.
तेव्हा सर्वांनी…च्या पाचव्या वाढदिवसाला यायचं हं.
दिनांक-
वेळ-
स्थळ-
5. व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
असा आर्शीवाद तुमच्याकडून हवा आहे
…. च्या पाचव्या वाढदिवसाला तुमच्या आर्शीवादाची बरसात हवी आहे
सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.
दिनांक-
वेळ-
स्थळ-
6. लेक म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा, तिच्यात रमतो जीव माझा
बघता बघता झाली पाच वर्षांची याचा आनंद करायचा आहे साजरा
सर्वांना ….च्या पाचव्या वाढदिवसाचे आमंत्रण.
दिनांक-
वेळ –
स्थळ –
7. आमचा सोनुला, आमचा छकुला
आता पाच वर्षांचा झाला
वाढदिवसाचे औचित्य साधून
आमचा आनंद व्यक्त केला…
आता तुम्ही सर्वांना उपस्थित राहून शुभार्शीवाद द्या त्याला.
दिनांक-
वेळ-
स्थळ-
8. एक,दोन, तीन, चार, पाच वर्षे कधी भुर्रकन उडून गेली कळलंच नाही… पाहता पाहता आमची चिऊताई पाच वर्षांची झाली.
श्री… कृपेने तिचा पाचवा वाढदिवस मोठ्या थाटामाटात योजिला आहे. तेव्हा आपण सहकुटुंब येऊन तिला शुर्भाशीवाद द्यावे हीच विनंती
दिनांक-
वेळ-
स्थळ-
9. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा घेऊन येणार दिवस हा, या मंगल क्षणाचे साक्षीदार सारे मिळून होऊ या…
…. च्या पाचव्या वाढदिवसाचे तुम्हा सर्वांना आाग्रहाचे निमंत्रण
दिनांक –
वेळ –
स्थळ-
10. शुभ काळ आणि शुभ समयी असावे सारे सगे सोबती
…. चा वाढदिवस साजरा करू या मिळून सारी नाती
सर्वांना …. च्या पाचव्या वाढदिवसाचे मनःपूर्वक निमंत्रण
दिनांक-
वेळ –
स्थळ –